प्राची कुलकर्णी - पुणे : कोरोना ची लस घेतल्यानंतर काहीच दिवसांमध्ये डाॅक्टर पॉझिटिव्ह होण्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयातील एक निवासी डॉक्टर यामध्ये पॉझिटिव्ह आलेली आहे.
कोरोना रुग्णांची थेट संपर्क येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ती ससून मधल्या डॉक्टर्स इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने लसीकरण करण्यात येत आहे. याच लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये या निवासी डॉक्टर चे देखील लसीकरण करण्यात आले होते. कलम करण्यापूर्वी या डॉक्टरला करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. यामुळेच या डॉक्टरचे आठ दिवसांपूर्वी लसीकरण करण्यात आले. मात्र यानंतर काहीच दिवसांमध्ये अंगदुखी सर्दी खोकला अशी लक्षणे दिसल्याने डॉक्टर ची तपासणी करण्यात आली. आहे असल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत लोकमत शी बोलताना ससूनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की ,"या डॉक्टर बाहेर गावी प्रवास करून आल्या होत्या. परतल्यानंतर त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे त्यांचे लसीकरण करण्यात आले मात्र लसीकरणानंतर काहीच दिवसात त्यांना लक्षणे जाणवायला लागली. चाचणी केल्यानंतर त्या पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. नंतर त्यांची तातडीने विलगीकरण करून ससून मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कदाचित लसीकरणा आधीच त्यांना संसर्ग झाला असून याची आणि त्याची लक्षणे नंतर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यामध्ये लसीचा नेमका काय परिणाम झाला आहे हे आता स्पष्ट करता येत नाही".