शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 1:54 PM

महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं.

ठळक मुद्दे कुणी कुणाच्या कचाट्यात नाही. तीन पक्षांची गरज आहे.महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं. हे काय टेस्ट ट्युब बेबी नसून बाळ व्यवस्थित जन्माला आलेलं आहे.

पुणेः कुणी कुणाच्या कचाट्यात नाही. तीन पक्षांची गरज आहे, महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं. हे काय टेस्ट ट्युब बेबी नसून बाळ व्यवस्थित जन्माला आलेलं आहे. त्याला पाळण्यात ठेवलंय अन् बारसंही झालंय, आता त्याचा वाढदिवस होईल, असं म्हणत संजय राऊतांनी महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार म्हणणाऱ्यांना जोरदार चपराक लगावली आहे. लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते.  ते शब्द पाळणार नाहीत याची मला खात्री होती. माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचं असंच त्यांनी ठरवलं होतं.  विधानसभेच्या जागावाटपासंबंधांत काही गोष्टी घडत गेल्या. हे नंतर गडबड करणार लक्षात आलं होतं, पण हे चक्र फिरत राहिलं. त्यातून हे सरकार निर्माण झाल्याचा खुलासाही संजय राऊतांनी केला आहे.  शरद पवारांवर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे, ठाकरे, पवार यांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव-पगडा आहे, हेच सरकार परिवर्तन घडवू शकतं. या सरकारला कुणी खिचडी सरकार म्हणत नाही, तर लोक सरकार म्हणताहेत. पुलोदची खिचडी म्हणत होते. या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करताहेत आणि सरकारच्या पाठीशी शरद पवार ठामपणे उभे आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. आमच्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे धक्कादायक नव्हते. पहिल्या दिवसापासून आमचं ठरलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हावं. मी सातत्यानं सांगितलं की, आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील. आमच्यासाठी मुख्यमंत्री कोण हा प्रश्न नव्हता. ताजच्या 11 तारखेच्या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. अजित पवार आणि फडणवीस यांनी एकत्र सरकार स्थपन केल्यावर आम्हाला फार काही वाटलं नाही. हा फुसका बार आहे हे माहीत होतं. आमच्या गाडीचं चाक नाही, तर ते आमची स्टेपनी घेऊन गेले होते, असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला. मुख्यमंत्री हा बॉस असतो आणि तो शिवसेनेचा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातल्या मातीतले पक्ष आहे. आम्हाला आकडा कळत नाही, आम्ही आकडा लावला. प्रत्येक खातं राज्यासाठी महत्त्वाचं असतं. गृह राष्ट्रवादीला दिलं हे आमचंच सरकार आहे. राज्याचा मुख्यमंत्री आमचा आहे, त्यामुळे सर्व खाती आमची आहेत. शिवसेनेनं आपल्याकडे येणारी कुठलीही खाती स्वतःकडे ठेवलेली नाहीत. शरद पवारांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं की हे सरकार बनवायचं ते टिकवायचे आणि आदर्श सरकार निर्माण करायचे. आज लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. पूर्ण 5 वर्षे सरकार आम्ही चालवणार आहोत. आता मुलाचं बारसं झालंय. पुढच्या 5 वर्षाचं सुद्धा आम्ही प्लॅनिंग करून ठेवलंय. आमची भूमिका ठाम असते. आम्ही करायचं ठरवलंय आणि सरकार चालवणार पडद्या मागच्या गोष्टी पडद्यामागे राहु द्या तर सिनेमा चालू राहील. हे सरकार सुपरहिट सिनेमा आहे. हे सरकार घडवण्यात अनेकांचे सहकार्य आहे. एक कलाकृती घडवताना अनेकांचे योगदान असते. सरकार हा समाजाभिमुख सिनेमा आहे. आम्ही उत्तम कलाकृती निर्माण केली आहे, त्याला तुम्ही हवं ते नाव ठेवा, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPuneपुणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी