शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

राज्यमंत्री भरणे म्हणाले, 'जे मला निष्क्रीय म्हणतात, त्यांची किव करावाशी वाटते'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:16 AM

भरणे म्हणाले, मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही. मात्र, त्यांनी स्वत:ला तपासावे...

बारामतीविरोधकांवर इंदापुरकरांनी अनेक वर्ष विश्वास ठेवला. मात्र, त्यांच्या नाकर्तेपणामुळे गावांना रस्ते,पाण्याची सोय  नव्हती. अवर्षणग्रस्त गावांच्या वाट्याला तर वनवासच आला. या गावामध्ये सोयरिक करायला देखील कोणी तयार होत नसे, अशी या गावांची २०१२ पूर्वी गावांची स्थिती बिकट होती, अशी टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( ncp dattatraya bharne) यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (harshwardhan patil) यांचे नाव न घेता केली.

तालुक्यातील अकोले, लाकडी, काझड येथील १३ कोटी ६६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमीपूजन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भरणे बोलत होते. यावेळी भरणे पुुढे म्हणाले, विरोधक मतांसाठी पदरात पाडून घेण्यासाठी लाकडी-निंबोडी योजना मार्गी लावण्याचे खोटे आश्वासन दिले जात असे. मात्र, आता ही योजना आता मार्गी लागणार आहे, त्यासाठी आर्थिक तरतूद देखील केली आहे. या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील ११ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे भरणे यांनी नमुद केले.

काही जण मला निष्क्रीय म्हणतात. त्यांची किव करावाशी वाटते. माझे चारित्र हनन करण्याचा देखील प्रयत्न करतात माझी शेतजमीन, माझा व्यवसाय सर्वांनाच पूर्वीपासून माहिती आहे. मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही. मात्र, त्यांनी स्वत:ला तपासावे. लोकांना १९९५ अगोदर त्यांची काय स्थिती होती. आज काय बदल झाला आहे, हे चांगलं कळतं. वैयक्तिक पातळीवर आल्यास आमच्याकडे देखील  खूप मसाला आहे. १९ वर्ष त्यांनी काम केले असते तर लोकांनी मला निवडून दिले नसते. त्यांनी काम केले नाही हे एका अर्थाने चांगले झाले. नाहीतर मला लोकांसाठी काम करता आले नसते,असा टोला देखील भरणे यांनी लगावला.

यावेळी प्रतापराव पाटील, सरपंच अजित पाटील  जिल्हा परिषद सदस्या हनुमंत बंडगर , प्रतापराव पाटील, बाळासाहेब पाटील, हनुमंतराव कोकाटे, रणजितसिंह निंबाळकर, सचिन सपकळ, विक्रमसिंह निंबाळकर, शुभम निंबाळकर उपस्थित होते.... सोलापूरमध्ये जाऊन काड्या केल्यासोलापूरचे ५ टीएमचे पाणी आपल्याला मिळाले तर आपल्याला मत मिळणार नाही, याच भीतीने आपल्याच तालुक्यातील नेत्याने सोलापूरमध्ये जाऊन काड्या केल्या, अशी टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली. सोलापूरकरांची यामध्ये काही चूक नाही. सोलापूरचे पाणी आपल्याला आणायचेच नव्हते, असे देखील भरणे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस