शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

कालव्याच्या ‘एक्स्पायरी डेट’ संपल्या

By admin | Published: December 24, 2016 12:21 AM

शेती सिंचनाची सोय होण्यासाठी ब्रिटिश काळात बांधलेल्या धरणांवर कालवे खोदण्यात आले. जवळपास सव्वाशे किलोमीटर लांबीचा

शेती सिंचनाची सोय होण्यासाठी ब्रिटिश काळात बांधलेल्या धरणांवर कालवे खोदण्यात आले. जवळपास सव्वाशे किलोमीटर लांबीचा नीरा डाव्या कालव्यावर लाखो एकर शेती पिकते. अनेक गावांना, शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. औद्योगिक वसाहतींना याच कालव्यातून पाणी दिले जाते. मात्र, सद्य:स्थितीला कालव्याची अवस्था दयनीय आहे. अनेक ठिकाणी बड्या शेतकऱ्यांनी कालव्याचे, चाऱ्यांचे भराव खोदून सायफनद्वारे पाणी नेण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे भराव खचले. मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. कालवा, वितरिका ठिकठिकाणी पाझरत आहे. त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने याबाबत घेतलेला आढावा.......कालव्याला कचराकुंडीचे स्वरूपनीरा डाव्या कालव्याच्या पाण्याला चांगलाच वेग असतो. तुडुंब भरलेला कालवा म्हणजे कचरा फे कण्याचे हक्काचे ठिकाण ही नवीन मानसिकता नागरिकांच्या मनात घर करीत आहे. कारण टाकलेला कचरा कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाच्या वेगात लगेच वाहून जातो. वाहून जाताना हा कचरा दिसत नाही. लगेच कालव्याच्या पोटात गडप होतो. कालव्यातून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाट मिळेल तिथे हा फेकून दिलेला कचरा वाहून जातो. मात्र, कालव्यातून पाणी बंद झाल्यानंतर फेकलेल्या कचऱ्याचे ढीग कालव्यामध्ये दिसून येतात. यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचा अधिक समावेश आहे. कालव्यामध्ये दिवसेंदिवस कचरा टाकणाऱ्यांचीच संख्या मोठी आहे. त्यामुळे कालव्याला आलेले कचराकुंडीचे स्वरूप अस्वस्थ करणारे आहे.बारामती : नीरा डावा कालवा बारामती, इंदापूर तालुक्याची जीवनदायिनी मानला जातो. या कालव्यामुळेच येथील उजाड माळरानांचा परिसर हिरवाईने फुलला आहे. सर्वत्र असणाऱ्या हिरव्यागार शेतांमुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. मात्र, देखभालदुरुस्ती, पडझड झाल्याने कालव्याची मोठी दुरवस्था झाली आहे. भराव खचले, भरावालगत अतिक्रमणे वाढली. त्यामुळे कालव्यातून पाणी झिरपण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. आवर्तन सुटल्यावर कालव्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचा डोह साठलेला असतो. नीरा डाव्या कालव्यावर अनेक पाणीपुरवठा योजनेसह हजारो एकर शेती सिंचन अवलंबून आहे. किंबहुना नीरा डाव्या कालव्यामुळेच या भागात कायापालट झाला आहे. येथील अर्थव्यवस्थेने कालव्याच्या पाण्यावरच उभारी घेतली आहे. साखर कारखानदारी विकसित झाल्याने मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीला मदत झाली. शेतकरीवर्ग ऊसशेती, फळबागांद्वारे सधन बनला. कालव्यातील पाण्यावरच येथे कमी पर्जन्यमानावरदेखील शेती फुलली आहे. सुमारे १०० हून अधिक वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यातून कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ही जीवनदायिनी अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे.बारामती, पणदरे, नीरा उपविभागामार्फत नीरा डाव्या कालव्यातील पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. त्यापैकी पणदरे उपविभागाअंतर्गत पणदरे, माळेगाव, वडगाव निंबाळकर, मानप्पावस्ती, मळद पाटबंधारे शाखेअंतर्गत त्यासाठी पाटबंधारे शाखा अभियंता, पाटकरी, कालवा निरीक्षक, कारकून, तारमास्तर आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती असते. पणदरे उपविभागाअंतर्गत वितरिका क्र. ८ ते २४ चे कामकाज चालते, तर बारामती उपविभागाअंतर्गत बारामती इंदापूर तालुक्यातील सणसर, अंथुर्णे, निमगाव केतकी, बावडा या पाटबंधारे कार्यालयांचे कामकाज चालते. त्याअंतर्गत २६ ब ते वितरिका क्र. ५८ चे कामकाज चालते. मात्र, सर्वच वितरिकांची दुरवस्था झाल्याची कबुली पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.(प्रतिनिधी)