पिंपरी : दिघी येथील गायरानावर वृक्षारोपण सीएमईतील मैदानावर करणे, तीन वर्षांची देखभालीसाठी ६१ लाखांच्या विषयासह, स्वच्छतागृहे बांधणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील साहित्य खरेदी करणे, राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी वाहने पुरविणे, मैला शुद्धीकरण करणे यासह सुमारे साडेसात कोटींचे विषय स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.महापालिका भवनात मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर तीस विषय मंजरीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. मागील आठवड्यात ३८ विषयांसह ऐनवेळेसचे ३७ विषय मंजूर केले होते. या आठवड्यात मागील आठवड्यातील स्थापत्य विभागाची कामे, राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी वाहने पुरविणे हे विषय पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दिघी गायरान गट क्रमांक ७७ मध्ये दहा हजार वृक्षांचे रोपण करणे आणि त्याची तीन वर्षे देखभाल करणे यासाठी प्रतिवृक्ष ६१० रुपये यानुसार सुमारे ६० लाख रुपयांचा विषय समितीने मंजूर केला असून, दिघी गायरानाऐवजी सीएमई दापोडी हद्दीतील सीईडीयू येथे वृक्षारोपण करण्यात मान्यता देण्यात यावी, असा विषय समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. पर्यावरण आणि अभियांत्रिकी विभागाकडील आकुर्डी येथील मैला शुद्धीकरण केंद्राची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी सुमारे दोन लाख ६८ हजार रुपयांच्या खर्चाचा विषय समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर मोशी कचरा डेपोसाठी दिलेल्या अहवालामध्ये उपाययोजना राबविण्यासाठी सुमारे दीड कोटींचा विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे. गणेश मंडळ स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमाची स्मृतिचिन्हे, प्रशस्तिपत्रके, बॅनर, फ्रेम रेंट, मान्यवर चहापान आणि भोजनासाठी सुमारे एक लाख २० हजार खर्चाचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर वायसीएम प्रयोगशाळेतील रक्तपेढीसाठी साहित्य खरेदीचा सुमारे २० लाख ४६ हजार खर्चाच्या विषयास कार्योत्तर मान्यता देणे, तसेच मुख्यमंत्र्यांना प्रेझेंटेशन देण्यासाठी अहवाल तयार करण्यासाठी सुमारे ३६ हजार ६०० रुपयांच्या खर्चाचे विषयसमितीसमोर ठेवले आहेत. हे काम जनता संपर्क विभाग किंवा संगणक विभागाचे आहे.(प्रतिनिधी)फुलेनगर येथील झोपडपट्टीत पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासाठी दोन कंपन्यांना कामे देणे यासाठी सुमारे ७० लाख, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अस्थिरोग विभागासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी सुमारे ४० लाख, शस्त्रक्रिया विभागासाठी चार लाख, राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी वाहने पुरविण्यासाठी सुमारे ९९ लाख आदी तहकूब विषय पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.पावसाळ्यात गाळ काढण्याचा विषयपवना नदीच्या वरील बाजूस असणाऱ्या जलउपसा केंद्राजवळील गाळ काढण्यासाठी सुमारे ३५ लाखांचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यात गाळ काढण्याचा विषय समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गाळ काढण्याचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाणीपुरवठा विभागासाठी ४२ लाखमिलिंदनगर, दळवीनगर, राहुलनगरात जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे ४२ लाख, संत तुकारामनगरातील मुख्य रस्त्यावर दुभाजक, कर्ब पेंटिंगसाठी सुमारे साडेसात लाख, तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पाणीपुरवठा देखभाल-दुरुस्तीचे सुमारे सहा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
वृक्षारोपणासाठी खर्च
By admin | Published: July 12, 2016 1:34 AM