शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महागडी वीजखरेदी महावितरणला परवडेना

By admin | Published: May 08, 2017 1:57 AM

कोयना धरणातील पाण्याचा महाराष्ट्राचा निर्धारित कोटा संपल्याने या केंद्रातील वीजनिर्मितीला फटका बसला आहे. महागडी खासगी

लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : कोयना धरणातील पाण्याचा महाराष्ट्राचा निर्धारित कोटा संपल्याने या केंद्रातील वीजनिर्मितीला फटका बसला आहे. महागडी खासगी वीजखरेदी (एक्स्चेंजमधील) आर्थिक चणचणीमुळे महावितरणने थांबविली आहे. सुमारे ४ हजार मेगावॉट भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे आणि चांगल्या पावसामुळे पाणी आहे; पण वीज नाही, या परिस्थितीला तोंड देण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. पाणी लवादाच्या वाटपानुसार कोयना धरणातून महाराष्ट्राच्या वाट्याला ६७ टीएमसी इतके पाणी आहे. गेल्या काही महिन्यांत योग्य नियोजन राखले न गेल्याने या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी भरमसाट वापर करण्यात आला आणि उन्हाळ्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले नाही. राज्याच्या हिश्शाचे पाणी संपल्याने कोयना प्रकल्पातून साधारणपणे मिळणारी एक हजार मेगावॉट वीज कमी झाली आहे. कोयनेचा टप्पा ४ तर कधीच बंद झाला होता. आता पहिल्या टप्प्यातील वीजनिर्मितीही थंडावली आहे. देशातच सध्या उन्हाळ्यामुळे विजेची मागणी कमालीची वाढली असून, पुरवठा कमी झाला आहे. वीजनिर्मिती संच बंद पडत आहेत. गुजरातमध्ये दोन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे खासगी वीजखरेदी प्रक्रियेद्वारे (एक्सेंजच्या माध्यमातून) मिळणारी वीज महाग होत चालली आहे.काही महिन्यांपूर्वी पावणेतीन रुपये प्रतियुनिट असलेला विजेचा दर पाच ते साडेपाच रुपये प्रतियुनिटवर गेला आहे. महावितरणकडे पुरेशी वीज उपलब्ध असल्याने खासगी वीजखरेदीची गरज फारशी भासत नव्हती आणि आर्थिक चणचणीमुळे महागडी वीजखरेदी करायची नाही, असे महावितरणने ठरविले  आहे. महागडी वीजखरेदी केल्यास  दर महिन्याला साधारणपणे ५०० कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन  करावा लागतो. हा भार घेऊन कृषीपंपांसाठी वीज पुरविणे हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत आहे. सुमारे ८५ ते ९० टक्के शेतकरी कृषीपंपांचे वीजबिलही भरत नाहीत. परिणामी, आर्थिक डबघाईला आलेल्या महावितरणने सध्या महागडी वीजखरेदी जवळपास थांबविली आहे.या परिस्थितीत संच बंद पडल्याचा आणि विजेची मागणी वाढल्याचा फटका बसला आहे. अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. त्यासाठी कोणतेही विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आलेले नसून, सर्व विभागात सूत्र न ठरविता भारनियमन सुरू असल्याने गोंधळ आहे. निवासी व अन्य ग्राहकांना अधिक वीजपुरवठा करण्यात येणार असून, कृषीपंपांना फारशी वीज उपलब्ध होणार नाही. त्यामुळे यंदा पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना वीज नसल्याने फटका बसणार आहे.