पुणे (बारामती) : येत्या ७ सप्टेंबर रोजी तिला चांद्रयान मोहिमेच्या लँडिंग क्षणाचा अनुभव घेता येणार आहे. सिध्दी विश्वंभर पवार असे या विद्यार्थीनीचे नाव आहे.ती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून लाँच करण्यात आलेलं चंद्रयान २ लँड होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.संपुर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. चंद्रयान २ चं लँडिंग स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही पाहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांसमवेत बसून या ऐतिहासिक क्षणाची ती साक्षीदार होणार आहे.
सिद्धी हिने इस्रोने आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमात पाच मिनिटात अवघड प्रश्नांची उत्तरं दिली. तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय. तिच्या यशामुळे तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चंद्रयान २ मोहिमेच्या लँडिंगचा अनुभव घेता येणार आहे.इस्रोने अवकाश कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांची जागृती वाढवण्याच्या टाकलेले हे पाऊल आहे. 'इस्रो'ने कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांची जाणीवजागृती वाढविण्याच्या दृष्टीने ऑनलाइन प्रश्नमंजूषा आयोजित केली होती.शाळेमार्फत देण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे तिला या प्रश्नमंजूषेची माहिती देण्यात आली. यामध्ये पाच मिनिटांत २० प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन सिद्धी हिने दिली.या परीक्षेद्वारे तिने १०० पैकी १०० गुण मिळवले.तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवत महाराष्ट्रातून जिंकण्याचा मान मिळवला. हे यश मिळविणारी ती राज्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.