शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सत्ता, संपत्तीपेक्षा जगण्यातील समृद्धता अनुभवा - सलील कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 2:44 AM

सत्ता, संपत्ती हे सगळं उथळ असून माझं माझं न करता आवडीच्या क्षेत्रात आनंदाने काम करताना प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगण्य्याचा प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी यांनी केले.

राजगुरुनगर : सत्ता, संपत्ती हे सगळं उथळ असून माझं माझं न करता आवडीच्या क्षेत्रात आनंदाने काम करताना प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगण्य्याचा प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी यांनी केले.हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत कवितेचं गाणं होतांना या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक शांताराम घुमटकर,अ‍ॅड.माणिक पाटोळे, उमेश आगरकर, अंकुश कोळेकर, माजी जि. प. सदस्य अनिल राक्षे, अ‍ॅड. राजमाला बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रा. ए.जी. कुलकर्णी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.डॉ सलील कुलकर्णी म्हणाले, आजकाल कोणीही पैशाची, कलेची किंव्हा राजकारणातील ताकदीची टिमकी वाजवीत असून समाजात बेडरपणा, निर्लज्जपणा अथवा पैशाची धुंदी वाढत चालली आहे. मात्र माणसाच्या मेंदूमधील एक छोटीशी रक्तवाहिनी तुमचं बोलणं चालू ठेवायचे की बंद करायचे हे ठरवू शकते. या पार्श्वभूमीवर माणसाने माणुसकी धर्म पाळला नाही तर माणसाची माय असलेली माती जेंव्हा हिशोबाला बसते तेंव्हा कोणालाच सोडत नाही अशी भावना मांडली. कुसुमाग्रजांच्या मातीची दर्पोक्ती या कवितेचे उदाहरण देताना ह्यअभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोष पाऊले पडती आमच्यावरुनी, त्या मत्त पदांना नच जाणीव अजुनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती, मातीवर चढणे एक नवा थर अंतीह्ण या ओळी सादर केल्या. पुन्हा एकदा पहिल्यापासून जगण्यासाठी ह्यलपवलेल्या कचरा या पुस्तकातील एका लेखाचे अभिवाचन केले.या कार्यक्रमात त्यांनी उच्चरणातील आनंद, मनाला उल्हास व प्रसन्नतेचा भाव देणारी ह्यअग्गबाई डग्गुबाईह्ण या अल्बममधील बालगीते तसेच हे गजवदन, येई गा विठ्ठला, क्षण अमृताचे, आयुष्यावर बोलू काही या अल्बममधील गीते सादर केली. गीतकार सुधीर मोघे, कवयित्री शांताबाई शेळके, कवी विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, ग्रेस या कवींच्या कवितांचे वेगवेगळे पदर, त्यातील सौदर्यस्थळ उलगडून दाखविली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांना कविता चांगली समजते असे सांगून त्यांच्याबरोबरब केलेला मैत्र जीवांचे या कार्यक्रमाच्या आठवणी सांगितल्या व त्यांची लोकप्रिय गीतेही सादर केली. भावसंगीतातील परमेश्वर असे लतादीदींचे वर्णन करून अजूनही त्या संगीतकाराच्या सूचनांनुसार गीत गातात. त्यांची शिकण्याची भूक कमी झाली नाही असे ते म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणे