पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कामधेनू योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सर्व सदस्यांनी या योजनेच्या, तसेच अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार गठित केलेल्या चौकशी समितीने चौकशी पूर्ण केली असून या योजनेत अनियमितता झाल्याचे आढळले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यासाठी संबंधित अहवाल हा सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एऩ पी़ मित्रगोत्री यांनी दिली़पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शेतकºयांसाठी राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. तसेच या विभागातर्फे दूध उत्पादन वाढविण्यासाठी राबविण्यात आलेली कामधेनू योजना ही शेतकºयांपर्यंत पोहोचली नसल्याने यावरून सभेत मोठा गदारोळ झाला होता. तसेच या योजनेचा निधी हडपण्याचा प्रकार झाला असल्याचा आरोपही बुट्टे-पाटील यांनी केला होता़ तसेच पशुसंवर्धन विभागामध्ये राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही़ जनावरांसाठीचे सोनोग्राफी मशीन धूळ खात पडल्या असून त्यांचा वापर होत नाही़ यामुळे लाखो रुपये खर्चून घेतलेल्या मशीन बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकाºयांनी शेतकºयांचेही हित पाहिले नाही, यास पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ पवार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता़या चौकशीत या योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे. पुढील कारवाईसाठी हा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला सादर करण्यात आला असून त्यानुसार कारवाई होणार आहे.
कामधेनू योजनेत गैरव्यवहार झाल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 3:34 AM