नीरा (पुणे) : नीरा येथील घातक रसायन निर्मिती करणाऱ्या ज्युबिलानट इंग्रिव्हीया कंपनीमध्ये आज मेंटेनन्सचे काम सुरू असताना येथील ऍसिड कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम करत असताना स्फोट होऊन यामध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. तर मेंटेनन्सचे काम सुरू असताना दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्यावतीने देण्यात आली आहे.
पुरंदर आणि बारामतीच्या सीमेवर असलेल्या कंपनीमध्ये अनेक वेळा अपघात होत असतात. मागील तीन वर्षांपूर्वी झालेल्या अपघात लोकांच्या अजूनही लक्षात असून आज शनिवारी पुन्हा एकदा या कंपनीमध्ये सकाळी ११ वाजलेच्या सुमारास एक स्पोट झाला इथेनॉल असिट प्लांटच्या मेंटनंसचे काम सुरू असताना हा स्पॉट झाला. या स्फोटामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.
परराज्यातील पवन कुमार व भरत सिंग हे जखमी झाले आहेत. एका युवकांचे नाव समजून शकले नाही. एक युवक अत्यवस्थ असल्याने त्याला पुणे येथील रुग्णालयात पाठवल्याचे लोणंदच्या खासगी रुग्णालयाकडून सांगितले आहे. यामध्ये तिघा जणांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्यांना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर यातील एकाला पुन्हा लोणंद येथून उपचारासाठी पुण्यामध्ये पाठवण्यात आले आहे. तर याध्ये एकूण चार जण जखमी असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. या संदर्भात कंपनी प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी यामध्ये दोन जण जखमी झाल्याच्या वृत्ताला दुसरा दिला आहे.