पुणे : काञज येथील संतोषनगर मध्ये एका घरात सिलेंडरची गळती होऊन स्फोट झाला. यामध्ये आई व मुलाला भाजले असून शुक्रवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. सायली सुमेध कांबळे ( वय ३० व आर्यन , वय ११ महिने ( अजून बारसं झालं नाही) अशी भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आई व मुलाचे नावे आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोषीमाता मंदिराजवळ पंचशील निवासमध्ये सायली कांबळे स्वयंपाक घरात आपला लहान मुलगा आर्यन सोबत काम करत होत्या. त्यांनी सिलेंडरवर पाणी गरम करण्यासाठी पातेले ठेवले होते, मात्र सिलेंडर लिकेज असल्याने तो सुरू करताच भडका उडाला. यामध्ये कांबळे यांच्या छातीला, हातांना व पायाला भाजले तर आर्यनच्या तोंडाला भाजले. दरम्यान कात्रजमध्ये सिलेंडर गळती झाल्याची माहिती कात्रज अग्निशामक केंद्राला मिळाली. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान ड्रायव्हर गौरव बाठे , ड्रायव्हर गणेश भंडारी, फायरमन रामदास शिंदे , महादेव मांगडे, प्रसाद कदम, सागर इंगळे निलेश तागुंदे, शुभम शिर्के हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक केंद्रातील जवान ड्रायव्हर गौरव बाठे यांनी प्रथम आग विझवली आणि सिलेंडर ताब्यात घेतला. व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
कात्रजला घरगुती सिलेंडरचा स्फोट, ११ महिन्यांच्या मुलासह आई जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 4:56 PM