दरम्यान, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील वीज वितरणच्या कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या ३३ केव्हीच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने वायर बस्ट होऊन मोठा स्फोट झाला व सर्वत्र वीज गेल्याने अचानकपणे हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज इटरनिस कंपनीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मात्र त्यामुळे दोन तीन वेळा झालेल्या मोठ्या आवाजाने व थोड्याफार निघालेल्या आगीच्या ज्वाळांमुळे जवळपास असणाऱ्या झगडेवाडी, मुकादमवाडी परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक प्रकल्प असल्याने स्फोटांच्या मालीका नेहमीच्या झाल्या आहे.मात्र सुदैवाने यामध्ये बऱ्यापैकी कंपनी प्रशासनाने सुधारणा करीत जीवितहानीसारख्या घटना टाळल्या आहेत. तर यापैकी बऱ्याच कंपनी प्रशासनाकडून घटना उघडकीस येण्यापासून रोखल्या देखील जात आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत असणाऱ्या बाबी आजही काही ठिकाणी दुर्लक्षित करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.