शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अर्जुन रणगाड्यांसाठी स्फोटकांचे संशोधन

By admin | Published: January 11, 2016 2:43 AM

शत्रूच्या सैन्यांना धडकी भरविणाऱ्या अत्याधुनिक अशा स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्यांच्या मारक क्षमतेत वाढ करण्यासाठी पुण्याने मोलाचे योगदान दिले आहे.

पुणे : शत्रूच्या सैन्यांना धडकी भरविणाऱ्या अत्याधुनिक अशा स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्यांच्या मारक क्षमतेत वाढ करण्यासाठी पुण्याने मोलाचे योगदान दिले आहे. या रणगाड्यांसाठी अत्याधुनिक स्फोटकांचे संशोधन पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) व हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबॉरेटरी (एचईएमआरएल) या लष्करी संस्थांनी केले आहे. अर्जुन रणगाड्यांवरून या स्फोटकांची यशस्वी चाचणी ओडिशामध्ये घेण्यात आली आहे. त्या मुळे लवकरच ही स्फोटके लष्करात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराकडील बहुतांश रणगाडे हे परदेशी बनावटीचे आहेत. लष्कराच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या रणगाड्यांची निर्मिती सुरू केली. यापैकी एक अर्जुन रणगाडा. या रणगाड्यांसाठी वापरण्यात येणारा दारूगोळा हा इतर रणगाड्यांसारखाच असल्याने, त्याची मारक क्षमता वाढत नव्हती. अत्याधुनिक रणगाड्यांंसाठी अत्याधुनिक आणि जास्त सक्षम, जास्त मारक क्षमता असलेली स्फोटके तयार करण्यासाठी संशोधन करण्याची जबाबदारी डीआरडीओच्या अंतर्गत येणाऱ्या एआरडीई व एचईएमआरएल या संस्थांकडे सोपविण्यात आली. त्यांनी संशोधन करून अत्याधुनिक स्फोटकांची निर्मिती केली. ही स्फोटके अर्जुन रणगाड्यांच्या गरजेनुसार डिझाइन करण्यात आल्याने, त्यांची क्षमता कित्येक पटींनी वाढली आहे.