बावडा : देशामध्ये गरजेपेक्षा अधिक साखर शिल्लक असल्याने व आगामी काळातही साखरेचे उत्पादन मुबलक प्रमाणावर होणार असल्याने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी शासनाने ५० लाख मे.टन साखर तातडीने निर्यात करावी, अशी मागणी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी येथे केली.शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी १८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सकाळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यानिमित्ताने सत्यनारायणाची महापूजा व होमपूजा कारखान्याचे संचालक प्रताप पाटील व त्यांच्या पत्नी कीर्ती पाटील या उभयताच्या हस्ते करण्यात करण्यात आली. क ार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार हे होते.नीरा-भीमा कारखान्याने मागील गळीत हंगामात गाळपाचे झालेल्या उसाला २४०० रुपयांचा दर जाहीर केलेला आहे. यापैकी २२०० रुपये शेतकऱ्यांना यापूर्वी दिलेले आहेत. बिलाची उर्वरित रक्कम शेतकºयांना लवकरच दिली जाईल. आगामी गळीत हंगामात सुमारे ७ लाख मे.टन ऊस गाळप उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवलेले आहे. तसेच, साखर उताºयाचे १२ टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे पाटील यांनी सांगितले.प्रास्ताविक कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी केले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलास वाघमोडे, विकास पाटील, मंगेश पाटील, किरण पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, मनोज पाटील, संग्राम पाटील, महादेव घाडगे, तानाजी देवकर, सुरेश मेहेर, श्रीमंत ढोले, दत्तात्रय शिर्के, रणजित रणवरे आदी उपस्थित होते.
५० लाख टन साखर निर्यात करावी : हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 2:20 AM