पुणे : बिगर बासमती तांदळाच्या निर्यात झालेली घट लक्षात घेता सरकारने मचंर्टाईज एक्पोर्ट फोरम इंडिया (एमईएस) ही योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत डिसेंबर ते मार्च २०१९ पर्यंत निर्यात होणाऱ्या बिगर बासमती तांदळावर निर्यातदारांना केंद्र सरकारमार्फत ५ टक्के रक्कम इन्सेटिव्ह स्वरुपात देण्यात येणार आहे. चालू वर्षी ८० ते ९० लाख टन तांदूळ निर्यात करण्याचे सरकारचे उद्द्ष्टि आहे. गत वर्षी निर्यातीत झालेली मोठी घट लक्षात घेऊन शासनाने एमईएस ही योजना राबविली असल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली. बिगर बासमती तांदळाला हमीभाव दर लागू झाल्यानंतर तांदळाच्या भावात तब्बल दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भारतीय बिगर बासमती तांदूळ महागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाला मागणी घटली आहे. परिणामी, चालू वर्षी बिगर बासमती तांदूळाच्या निर्यात तब्बल १३ टक्क्यांनी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील भारतीय तांदळाची घसरण होत असल्याने केंद्र सरकारने निर्यात वाढीसाठी एमईएस योजना जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतासह पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, चायनामधून मोठ्या प्रमाणात बिगर बासमती तांदूळ निर्यात केला जातो. यामध्ये, भारतातून सर्वाधिक तांदूळाची निर्यात करण्यात येते. यंदा प्रथमच केंद्र सरकारकडून भातासाठी मूल्यवर्धित दर लागू करण्यात आला. त्यामुळे भाताचे भाव तब्बल दोनशे रुपयांनी वाढ होऊन प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भाताचे भाव दहा टक्क्यांनी जास्त निघाले. त्यामुळे, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया व आफ्रिका आदी देशांनी भारतातून येणाºया महागड्या तांदळाऐवजी इतर देशांकडून तांदूळ खरेदी करण्यास प्राधान्य दिले. त्याचा परिणाम तांदळाच्या निर्यातीवर होऊन २०१८-१९ च्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ३७.२० लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी हे प्रमाण ४३ लाख टन एवढे होते.
बिगर बासमतीची निर्यात घटली ; निर्यात वाढीसाठी ५ टक्के अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 1:07 PM
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतासह पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, चायनामधून मोठ्या प्रमाणात बिगर बासमती तांदूळ निर्यात केला जातो.
ठळक मुद्देशासनाचे चालू वर्षांत ८० ते ९० लाख टन तांदूळ निर्यात करण्याचे उद्दिष्टतांदळाच्या भावात तब्बल दहा टक्क्यांनी वाढ बिगर बासमती तांदळाला हमीभाव दर लागू चालू वर्षी बिगर बासमती तांदूळाच्या निर्यात तब्बल १३ टक्क्यांनी घटगेल्या वर्षी हे प्रमाण ४३ लाख टन एवढे