(फोटो ओंकारने जेएमएडिट इमेलने पाठवले आहेत)
पुणे : मालमत्ता नोंदणीसाठी चार महिन्यांची मुदतवाढ द्यावी आणि दंड माफी करावी, अशी मागणी क्रेडाई या संस्थेने राज्य सरकारकडे केली आहे. डिसेंबरअखेर लागू झालेल्या नोंदणीसंदर्भात ही मागणी करण्यात आली आहे.
क्रेडाई ही महाराष्ट्रातील बांधकाम विकसकांची संस्था आहे. या संस्थेने राज्य सरकारकडे कोरोना साथीच्या आजारामुळे नोंदणीस विलंब झाल्यास दंड आकारू नये, अशी मागणी केली.
यासंदर्भात नोंदणी व मुद्रांक महासंचालकांना पत्र लिहिले आहे. 1908 च्या नोंदणी कायद्याच्या कलम 2 नुसार, करार दस्तऐवजाच्या तारखेच्या चार महिन्यांच्या आत सर्व कागदपत्रांची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर दंड हा नोंदणी फीपेक्षा 10 पट जास्त नसावा, दरमहा प्रत्येक महिन्यात तो आकारला जावा, अशी मागणी केली आहे.
क्रेडाईचे प्रदेशाध्यक्ष सुनील फुर्डे म्हणाले की, राज्य सरकारने रिअल्टी क्षेत्राला चालना देण्यासाठी 3 % मुद्रांक शुल्क माफी दिली आणि नोंदणीची कागदपत्रे 31 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्याची कोविड परिस्थिती, प्रवासी निर्बंध आणि एकूणच आरोग्याची भीती मालमत्ता नोंदणीत अडथळे आले आहेत. त्यामुळे त्याला चार महिन्यांची मुदतवाढ द्यावी ,अशी मागणी आहे.
“राज्याचे नोंदणी व मुद्रांक महासंचालक (आयजीआर) यांना कलम 34 च्या कलम 2 अन्वये आकारण्यात येणाऱ्या दंडांमधील पूर्णपणे किंवा काही प्रमाणात फरक पाठविण्याचे नोंदणी अधिनियम कलमच्या अंतर्गत अधिकार आहेत. आम्ही आपणास यास मुदतवाढ देण्याची विनंती करतो. ''आणखी चार महिन्यांचा कालावधी आहे,'' असे क्रेडाई महाराष्ट्रने लिहिले आहे.
राज्य आयजीआर अधिकाऱ्यांनी हे पत्र मिळाल्याची पुष्टी केली आहे. ते विचारात घेण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.
...............................
राज्य सरकारने रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत 3% मुद्रांक शुल्क माफी दिली होती. त्याचा मोठा फायदा राज्यातील जनतेला झाला व त्याचबरोबर गृह खरेदीला चांगली चालना मिळाली तसेच राज्याच्या तिजोरीत भर झाली.
आम्ही प्रदेश युवक काँग्रेसकडून राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत की, 120 दिवसाच्या नियमात बदल करून त्यात आणखी थोडा कालावधी वाढवून द्यावा व येणारा दंड माफ करावा. जेणेकरून राज्यातील जनतेला कोरोना परिस्थितीत त्याचा फायदा होईल.
-अक्षय जैन
सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
....................................
कोरोना कालावधीत नोंदणी आणि तत्सम कामांसाठी ग्राहक घराबाहेर पडला तर संपूर्ण कुटुंबाला धोका होऊ शकतो. तरी राज्य सरकारने मुदतवाढ तातडीने जाहीर करावी.
- महेश सलुजा, उपाध्यक्ष, परांजपे स्कीम्स कंस्ट्रक्शन प्रा. लि.
.................................