पुणे : कोरोना आपत्तीत आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण लक्षात घेता, राज्य शासनाने ३१ मे, २०२१ रोजी सेवानिवृत्त होणऱ्या १९३ आरोग्य अधिकाऱ्यांना १ वर्षाची मुदतवाढ देऊ केली आहे़
कोरोना आपत्तीत पायाभूत सुविधांबरोबरच आवश्यक मनुष्यबळाचा आजही तुटवडा होत आहे़ त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागाकडून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे़ जिल्हा रुग्णालयांसह, सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आदी ठिकाणी सुविधांबरोबरच वैद्यकीय मनुष्यबळ पुरविण्याचेही मोठे आव्हान सध्या राज्य शासनासमोर आहे़
अशातच महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील विविध संवर्गातील तब्बल १०३ अधिकारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत होत व याचा मोठा परिणाम आरोग्य सेवेवर झाला असता़ तसेच कोरोना आपत्तीतही वैद्यकीय सेवकांच्या कमतरतेवर त्याचा परिणाम लक्षात घेऊन, राज्य शासनाने या सर्व सेवानिवृत्त होणा-या अधिका-यांना १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे़ याबाबत राज्य शासनाने ३१ मे रोजीच परिपत्रक काढले आहे़
आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ पदावरील अधिकारी तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ व वरिष्ठ पदावरील अधिका-यांना यात एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे़
------------------------