पुणे : शहरातील ज्या निवासी मिळकतींची 40 टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे, अशा मिळकतींना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून ‘पीटी-3’ अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबर ही शेवटची मुदत असली तरी, सलग शासकीय सुट्या तसेच दिवाळीच्या सणामुळे अनेकांना हे अर्ज भरता येणार नसल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ४० टक्के सवलतीचा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे.
शहरातील सुमारे तीन लाख मिळकतधारकांची ही सवलत रद्द झालेली असली, तरी अद्याप केवळ ६९ हजार नागरिकांनीच हा अर्ज भरलेला आहे. त्यामुळे, अनेक नागरिकांना अद्यापही याबाबत पुरेशी माहिती नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, अद्यापही 2 लाख मिळकत धारकांनी अर्ज भरलेले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ज्यांची सवलत रद्द झाली आहे, त्यांनी स्वत: राहत असल्याचे पुरावे घेऊन सवलत पूर्ववत करावी तसेच जादा कर भरलेला असल्यास तो चार समान हप्त्यांमध्ये मिळकतकरात समायोजित करावा, असे आदेश काढले आहेत
मिळकतींची 40 टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे, अशा मिळकतींना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून ‘पीटी-3’ अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबर ही शेवटची मुदत असली तरी सलग शासकीय सुट्या तसेच दिवाळीच्या सणामुळे अनेकांना हे अर्ज भरता येत नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार हे अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश गुरुवारी काढण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी सांगितले.