पुणे : शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महापालिका हद्दीमध्ये होणार असल्याने, पुणे महापालिकेची हद्द क्षेत्रफळाच्या तलुनेत मुंबई शहरापेक्षा अधिक होणार आहे़ मुंबई महापालिका हद्दीचे क्षेत्रफळ ४५० चौरस किलोमिटर आहे, पण आता पुण्याचे क्षेत्र यापेक्षा जास्त म्हणजे ४८० चौरस किलोमिटर इतके होणार आहे़
पुणे महापालिकेची हद्दीत नव्याने समाविष्ट होणाºया ३४ गावांच्या पूर्वी म्हणजे १९९७ मध्ये २५० चौरस किलोमिटर होती़ महापालिकेचा ठराव व शासन निर्णयानुसार सन २०१७ मध्ये या ३४ गावांपैकी ११ गावांचा समावेश पुणे महापालिका हद्दीत करण्यात आला़ तेव्हा महापालिकेची हद्द ३३० चौरस किलोमिटर एवढी झाली़ व आता नव्याने समाविष्ट होणाºया २३ गावांची १५० चौरस किलोमिटरची हद्द पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट होणार असल्याने, पुण्याने मुंबईलाही मागे टाकले आहे़
सदर २३ गावांच्या समावेशामुळे पुणे महापालिकेची हद्द ४८० चौरस किलोमिटर होणार असून, पुणे महापालिका हद्दीतील लोकसंख्येत साधारणत: १८ ते १९ लाखाने वाढ होणार आहे़ सध्या पुणे शहराची लोकसंख्या सुमारे ४० लाख आहे़
दरम्यान या गावांच्या समावेशाबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी येत्या चार ते पाच महिन्यात ही गावे अधिकृतरित्या पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट होतील असे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे़