शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इंटरनेट सेवा देणाऱ्या व्यावसायिकाला मागितली खंडणी; दोघांना मोक्का कोठडी

By नम्रता फडणीस | Updated: November 27, 2023 16:16 IST

पुणे : जर तुम्हाला काम करायचे असेल तर आम्हाला दर महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगत इंटरनेट ...

पुणे : जर तुम्हाला काम करायचे असेल तर आम्हाला दर महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगत इंटरनेट सेवा देणाऱ्या व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या दोघांना दि. ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष न्यायाधीश पी.पी जाधव यांनी मोक्का कोठडी सुनावली.

अतुल अनिल धोत्रे (वय २१, रा. ३६३/२ वडारवाडी कुसाळकर बिल्डिंग) आणि तेजस शिवाजी विटकर ( वाया २१ भाभा हॉस्पीटल मागे वडारवाडी ) अशी मोक्का कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निखिल बाजीराव भोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा इंटरनेटची सेवा देण्याचा व्यवसाय आहे. दि. २१ ते २५ ऑक्टोबर दरम्यान वडारवाडी येथील माणिकचंद टॉवर कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे फिर्यादी यांचे कामगार इंटरनेटचे एरिअल फायबर टाकण्याचे काम करीत असताना आरोपी निखिल शिवा कांबळे व अतुल अनिल धोत्रेयांनी धमकी देत त्यांचे काम थांबविले.

आरोपी निखिल शिवा कांबळे, अतुल अनिल धोत्रे आणि तेजस शिवाजी विटकर यांनी फिर्यादी यांच्याकडे १० हजार रुपयांच्या खंडणीची मागणीत तडजोडी अंती फिर्यादी यांच्याकडून ४००० रुपये शुल्क स्वीकारले. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ३१ ऑक्टोबर ला न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला होता. मात्र दाखल गुन्हयात १० नोव्हेंबरला मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्यात आला. त्यामुळे जामिनावर बाहेर असणा-या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

त्यांच्याकडे तपास करणे बाकी असल्याने आरोपींच्या अटकेची परवानगी घेण्यात आली. त्यानुसार अतुल अनिल धोत्रे व तेजस शिवाजी विटकर यांना दाखल गुन्हयात अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले तर आरोपी निखिल शिवा कांबळे हा जामिनावर आहे. अटक आरोपी व जामिनावर असलेला आरोपी यांचेआधारकार्ड व पॅनकार्ड प्राप्त करून आरोपी व त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने काही स्थावर, जंगम मालमत्ता आहे का? याबाबत माहिती मिळवायची आहे.

तसेच महसूल, आयकर विभाग तसेच त्यांच्या नावे वाहन खरेदी असल्यास त्याबाबत प्रादेशिक परिवहन विभाग पुणे व पिंपरी चिंचवड तसेच त्यांच्या बँक खात्याबाबत माहिती मिळवण्यासाठी बँक व पोस्ट ऑफिस यांना पत्रव्यवहार करायचा आहे असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. तो ग्राह्य धरून दोघांना मोक्का कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMCOCA ACTमकोका कायदा