शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

साेळा-साेळा तास काम; पगाराची मात्र बाेंब! कंपन्यांकडूनच कंत्राटी सुरक्षारक्षकांची पिळवणूक

By प्रमोद सरवळे | Published: November 13, 2022 12:42 PM

सरकार दरबारी मात्र याबद्दल अनास्थाच

पुणे : सलग १२ ते १६ तास काम. कधीकधी डबल म्हणजे दिवसा व रात्रीही ड्यूटी. अनेकांना ना पीएफ मिळतो, ना बोनस. आरोग्याची हमी तर दूरच, अशी व्यथा आहे कंत्राटी सुरक्षारक्षकांची. शहरातील इमारती, सोसायट्या, ऑफिस, शाळा, कॉलेज, विद्यापीठे, महापालिकेसारखी सरकारी कार्यालये येथील सुरक्षारक्षक दिसायला रुबाबदार असला तरी ताेही आर्थिक पिळवणुकीचा शिकार ठरत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. सरकार दरबारी मात्र याबद्दल अनास्थाच आहे.

अशी आहे पद्धत

ज्यांना कंत्राटी सुरक्षारक्षक हवे आहेत, अशा कंपन्या निविदा जाहीर करतात. कंत्राटदारही निविदा दाखल करतात. कंपनी त्यातील पात्र कंत्राटदाराला कंत्राट देते. ते कंपनीला कामगार पुरवतात. त्या बदल्यात कंपनी कंत्राटदाराला पैसे देते. त्यातून कंत्राटदार कामगारांना पैसे देतो. यात त्याचा नफा गृहीत धरलेला असतो.

अशी होते आर्थिक पिळवणूक

- मालकाकडून जास्तीची रक्कम; पण कामगारांना कमी.- अशिक्षित, गरीब, कामाची गरज असल्याने आवाज काेण उठवणार.- साेळा-साेळा तास काम करूनही माेबदला तुटपुंजाच.

कायदा काय म्हणतो?

- कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आहे. त्यानुसार आठवड्यातून एकदा सुटी, २० दिवसांना १ रजा मिळायला हवी. सार्वजनिक सुट्या पगारी हव्यात.- कंत्राटदाराने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा केलाच पाहिजे.- नोकरीसाठी आवश्यक ते साहित्य कंत्राटदारानेच दिले पाहिजे.

सरकारचे संरक्षण; पण कागदी!

- कंत्राटी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षारक्षक बोर्ड आहे.- कामगार प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी आणि शासनाचा प्रतिनिधी त्याचे सदस्य असतात.- उपायुक्त दर्जाचा अधिकारी याचा अध्यक्ष असतो.- पुणे बोर्डात सध्या अध्यक्ष हेच एकमेव सदस्य आहेत. अन्य सदस्य नाहीत.

हे आहेत बोर्डाचे अधिकार

सुरक्षारक्षकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन बोर्ड कंत्राटदार किंवा त्याने ज्यांना कामगार पुरवले आहेत, त्यांना विचारणा करू शकते. त्यांच्यावर कारवाईची शिफारस कामगार कार्यालयाकडे करता येते.

''सध्याचे एक सदस्यीय सुरक्षारक्षक बोर्ड लवकरच बहुसदस्यीय होणार आहे. त्याच्यावर सध्या विचार सुरू असून, पुढील दोन महिन्यांत सुरक्षारक्षक बोर्डात शासनाच्या प्रतिनिधींसह इतर सदस्यही असतील. जे खासगी कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करतात, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - सुरेश खाडे (कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य)''

''ज्या सुरक्षारक्षकांवर अन्याय होत आहे, अशांनी न डगमगता पुढे येत तक्रारी कराव्यात. कायद्याने कंत्राटदार व त्यांना काम देणारी संस्था या दोघांवरही कामगारांचे नुकसान होणार नाही, याची जबाबदारी दिली आहे. त्याचे पालन ते करत नाहीत. - सुनील शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर संघ.''

''सर्व सरकारी नियमांचे पालन करून आमची कंपनी गेल्या ६० वर्षांपासून कार्यरत आहे. आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही प्रशिक्षणासोबत वेळेत पगार, बोनस, युनिफॉर्म आणि इतर सुविधा पुरवतो. अन्य कंपन्यांबाबत माहिती नाही. - डॉ. रवींद्र पोमण, संचालक, पूना सिक्युरिटी इंडिया प्रा. लि.''

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकMONEYपैसाGovernmentसरकार