पुणे : शहरातील मुख्य बसस्थानकांवरून दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दीनुसार पीएमपीमार्फेत रात्रभर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. या पार्श्वभूमीवर पीएमपीतर्फे जादा २७० रात्रबस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
ही बस रात्री १० बसयात्रा संचालनात सुरू ठेवण्यात येणार आहे. या बसला नियमित दरांपेक्षा ५ रुपये जादा दर आकारण्यात आला आहे. यामध्ये प्रवाशांच्या सेेवेसाठी जादा कर्मचारी व अधिकारी संख्या वाढवली आहे.
या बसस्थानकांवरून सुटणार गाड्या...
बसस्थानक संख्या
निगडी ७०
चिंचवडगाव ३५
भोसरी ६२
पिंपळे गुरव २०
सांगवी १५
आकुर्डी रेल्वे स्टेशन १६
चिंचवड मार्गे डांगे चौक ३०
मुकाई चौक रावेत १२
चिखली, संभाजीनगर १०