शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शिवाजीनगर स्थानकात अतिरिक्त रेल्वेमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 2:15 AM

शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा विस्तार केला जाणार असून त्याअंतर्गत एक अतिरिक्त रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे.

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा विस्तार केला जाणार असून त्याअंतर्गत एक अतिरिक्त रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे. तसेच फलाटाची लांबी वाढविणे, स्थानकापर्यंत रस्ता करणे यांसह अन्य सोयीसुविधा करण्याची योजना असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, या कामांसाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक असल्याचेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.पुणे ते लोणावळा मार्गावर शिवाजीनगर स्थानक महत्त्वाचे आहे. या स्थानकावर जवळपास ११ मेल व एक्स्प्रेस गाड्या थांबतात. पण, फलाटांची लांबी कमी असल्याने प्रवाशांना चढताना व उतरताना त्रास होतो. त्यामुळे या फलाटांची लांबी वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने रेल्वेकडून काम सुरू केले आहे. तसेच, परिसराचाही विकास करण्याचे प्रस्तावित आहे.पुढील काळात मेट्रो, रेल्वे व बस सेवा एकमेकांना जोडण्याची योजना आहे. त्यासाठी अतिरिक्त जागा लागणार आहे. स्थानकात अतिरिक्त रेल्वेमार्गही टाकला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणाहून लोकल सेवा सुरू होणे शक्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, सध्या अतिक्रमणामुळे ही कामे करता येत नाहीत. त्यामुळे परिसरातील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांना जागा सोडण्याची नोटीस दिली असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शिवाजीनगर स्थानकाबरोबरच इतर स्थानकांवरही प्रवाशांसाठी सुविधा वाढविण्याचे काम सुरू आहे. दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, वडगाव व मळवली या स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढविली जाणार आहे. त्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दापोडी, पिंपरी, चिंचवड, तळेगाव, वडगाव स्थानकांवर हे काम सुरू केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPuneपुणे