काºहाटी : पावसाने दडी मारल्याने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण चाराटंचाई जाणवत आहे. जनावरांना चारा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. योजनांमधून पाझरतलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बारामतीचा जिरायती भाग म्हणून ओळखला जाणारा काराटी, जळगाव सुपे, जळगाव क. प., भिलारवाडी, माळवाडी, फौंडवाडा, बाबुर्डी, देवळगाव रसाळ आदी भागांत या वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांनी जिवापाड सांभाळलेली जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न पडला आहे. त्यांना चारा कोठून आणायचा, या विवंचनेने शेतकºयांची झोप उडाली आहे.यंदाच्या उन्हाळ्यात हवालदिल झालेल्या शेतकºयाला मोसमी पूर्व पाऊस पडेल, खरीप हंगामात पिके घेऊन कुटुंबाला तसेच पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना चारापिके घेऊन प्रश्न मिटविण्याचा मानस होता. मात्र, अतिशय बिकट परिस्थितीला सामना करण्याची वेळ शेतकºयावर आले आहे.शेतात पिके नाहीत, विहिरींना पाणी नाही, बंधारे- पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. पावसाळ्याचे तीन महिने संपत आले, तरीदेखील थोडासा तरी पाऊस पडेल, या आशेवर बसलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे. या भागात पाच वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असल्याने शेतकरीवर्गात कमालीची नाराजी पसरली आहे.शासनाने जनाई-शिरसाई व पुरंदर उपसा योजनेतून पाझर तलाव व बंधारे भरून दिले, तर या भागातील दुष्काळ काही प्रमाणात नाहीसा होईल. मात्र तरीदेखील शासन पाऊल उचलत नसल्याची खंत येथील शेतकरी शिवाजी वाबळे, उद्धव वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
जिरायती भागात तीव्र चाराटंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:12 AM