वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. शेततळ्याला कोरड पडल्याने चौफेर दुष्काळाचे सावट पसरले आहे. दोन वर्षांपासून जिरायती भागातील खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामही वाया गेला आहे.इंदापूर तालुक्यात पावसाळा संपला. हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरीही नदी, नाले, ओढे कोरडे पडलेले दिसत आहेत. दोन वर्षांपासून ओढ्याला पाणीच आले नसल्यामुळे विहिरी व विंधन विहिरींनी तळ गाठला आहे.जनावरांसाठी हिरवा चाराजून महिन्यात सुरुवातीला जोरदार पावसाचे आगमन झालेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. जनावरांसाठी हिरवा चारा मिळविण्यासाठी शेतकºयांवर दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात तीन सहकारी साखर कारखान्यांना सुरूवात झाली असल्यामुळे ऊस व वाड्याच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. सध्या कडब्याच्या एका पेंडीला ३५ रुपये दर आहे.
पाण्याच्या पातळीत कमालीची घट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:53 PM