नीरा : पुरंदर भाजपच्यावतीने नीरा (ता. पुरंदर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे पुणे जिल्हा नेते बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली व पुरंदर भाजपचे तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
आरोग्य सप्ताहानिमित्त आज नीरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होती. भाजपचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी मंगळवारी सकाळी या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राधा माने, तालुका उपाध्यक्ष सुरेंद्र जेधे, चंद्रशेखर काकडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नाना जोशी, हरिभाऊ कुदळे, अशोक रणदिवे, कल्पना पटेल, नेहा शहा, मच्छिंद्र लकडे, योगेंद्र माने, शिवाजी वळकुंदे, सतीश दुर्वे, सोज्वल शहा, शामराजे कुंभार, डाह्याभाई पटेल, संतोष मोरे, मुकेश खोमणे, सुजाता जाधव, मच्छिंद्र लाकडे इत्यादी उपस्थित होते. पुणे येथील देसाई हॉस्पिटलचे डॉ. महेश पवार यांनी यावेळी नेत्र तपासणी केली. दिवस भरात २५० लोकांनी नेत्र तपासणी केली अशी माहिती ग्रामपंचायतीच्या सदस्या राधा माने यांनी दिली.
--
फोटो क्रमांक - २१ नीरा नेत्र तपासणी शिबिर
फोटोओळ : नीरा येथे भाजपच्या वतीने नेत्रतपासणी शिबिरात लोकांनी रांगा लावून नेत्रतपासणी करून घेतली.