बारामती : केवळ राजकीय द्वेषापोटी नीरा-देवघर धरणाचे बारामती, इंदापूर या तालुक्यांना मिळणारे पाणी बंद करून भाजप सरकार या भागावर सूड तर उगवत नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे राजकीय आकसापोटी सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सध्या सुरू असल्याची चर्चा बारामती-इंदापूर तालुक्यांत सुरू आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी नीरा-देवघर धरणातील पाण्याचे बारामती व इंदापूर या तालुक्यांना होणारे वाटप थांबविण्यासाठी जलसंपदा विभागाला पत्र दिले होते. नीरा-देवघर धरण २००७मध्ये पूर्ण झाले. या धरणाची साठवण क्षमता १२ टीएमसी एवढी आहे. या धरणावर १९८ किमीचा एक उजवा कालवा आहे. या कालव्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या कालव्यावर भोर, फलटण, माळशिरस, खंडाळा आदी तालुक्यांतील गावे लाभक्षेत्रात आहेत. मात्र, या कालव्याचे काम रखडल्याने नीरा-देवघर धरणातील १२ टीएमसी पाणी २०१२मध्ये झालेल्या ५ वर्षांच्या करारानुसार ६० टक्के पाणी नीरा डावा कालव्याला, तर ४० टक्के पाणी नीरा उजवा कालव्याला देण्याचा निर्णय घेतला. या कराराची मुदत २०१७पर्यंत होती. खासदार रणजित निंबाळकर यांनी बारामती, इंदापूरला येणारे नीरा-देवघरचे ६० टक्के पाणी कमी करून नीरा-देवघर धरणातील १०० टक्के पाणी वीर धरणातील नीरा उजवा कालव्याला सोडावे, अशी मागणी केली. या मागणीमुळे नीरा-देवघर धरणावरील भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्यांतील खरे लाभार्थी पाण्यापासून वंचितच राहणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना न्याय दिला, असा डंका पिटणारे लाभक्षेत्राचे पाणी पळवून नेऊ पाहत असल्याचा प्रकारही यानिमित्ताने समोर आला आहे. नीरा-देवघर धरणाच्या उजवा कालव्याद्वारे भोर, खंडाळा, फलटण व माळशिरस या तालुक्यांतील ४३,०५० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन होते. नीरा-देवघर उजवा कालव्याच्या १९८ कि.मी. लांबीपैकी १ ते २५ कि.मी. कालवा भोर तालुक्यात, २६ ते ७८ कि.मी. कालवा खंडाळा तालुक्यात, ७९ ते १६३ कि.मी. कालवा फलटण तालुक्यात व १६४ ते १९८ कि.मी. कालवा माळशिरस तालुक्यात येत आहे. या कालव्यांच्या लाभक्षेत्रात खंडाळा तालुक्यातील ५७, फलटण तालुक्यातील ५१, भोर तालुक्यातील ३८ व माळशिरस तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. मात्र, नीरा-देवघर धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पंढरपूर व सांगोला तालुक्यांचा समावेश नाही. नीरा-देवघरच्या पाण्याचा लाभ या तालुक्यांना होणार असल्याचे चित्र रंगवले जात आहे. परंतु, नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्यास माळशिरस तालुक्यापर्यंतच्या गावांना लाभ मिळेल. .................उजव्या कालव्यातून चार तालुक्यांना पाणीवीर धरणाच्या १९५४ प्रकल्प आराखड्यानुसार उजवा कालव्यातून फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या चार तालुक्यांना ५७ टक्के पाणी, तर डावा कालव्यावरील पुंरदरचा काही भाग, बारामती, इंदापूर या तालुक्यांतील काही गावांना ४३ टक्के पाणीवाटपाचे नियोजन आहे. ............४नीरा-देवघरच्या उजवा कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वीर धरणाच्या उजवा व डावा कालव्याला मिळणारे पाणी कमी होईल. ४सध्या नीरा-देवघरचे शिल्लक पाणी देऊनदेखील फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या उजवा कालव्यावरील; तर पुरंदर, बारामती, इंदापूर या डावा कालव्यावरील लाभक्षेत्राचे सिंचन पूर्ण होत नाही. ४त्यामुळे भविष्यात नीरा-देवघरच्या कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता लाभ घेणाºया गावांना मोठी टंचाई भासणार आहे. ...........बारामतीला दणका’ ही विधानसभेसाठीची खेळी1नीरा-देवघरच्या पाण्याचे वास्तव वेगळे असतानादेखील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप शासन राजकीय पोळी भाजण्याचा डाव खेळत असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सांगिलते. 2एकीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन वृत्तवाहिन्यांवर नीरा-देवघर धरणावरील कालव्याचे काम पूर्ण केले असल्याचे सांगतात. मात्र, प्रत्यक्षात या कालव्याचे अद्यापही मोठे काम अपूर्ण आहे. त्यामुळे राजकीय द्वेषापोटी ‘बारामतीला दणका’ ही खेळी खेळली जात असल्याचेही स्पष्ट होत आहे. 3भविष्यात नीरा-देवघरच्या कालव्याचे काम पूर्ण झाल्यास केवळ बारामतीलाच नाही, तर सातारा व सोलापूर या जिल्ह्यांतील वीर-भाटघरच्या लाभक्षेत्रातील तालुक्यांनासुद्धा याचा फटका बसणार आहे. तसेच, खासदार रणजित निंबाळकर यांच्या एका मागणीवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन अध्यादेश काढायला तयार होतात; मात्र खडकवासला धरणातून पुणे शहराला होणाºया अतिरिक्त पाणीवापरावर न्यायालयाने निर्णय देऊनसुद्धा निर्बंध आणले जात नाहीत. ..............
निर्णय झाल्यास हजारो एकर क्षेत्राला बसणार फटकालासुर्णे : बारामती व इंदापूर या तालुक्यांना वरदान ठरलेल्या नीरा डावा कालव्याचे ३ टीएमसी पाणी कपात करून ते नीरा उजवा कालव्यातून फलटण, माळशिरस व सांगोला या तालुक्यांना देण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घेतल्याने बारामती व इंदापूर या तालुक्यांतील हजारो एकर शेतीला त्याचा फटका बसणार आहे. दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांनी या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पुढील काळात नीरा डावा कालव्याचे पाणी पेटणार आहे........पावसाचे पडलेले पाणी वाया न जाता साठवून अथवा अडवून शेतीला वापर व्हावा, यासाठी इंग्रजांच्या काळात धरणे बांधण्यात आली. धरणातून नीरा डावा व उजवा कालव्यांमार्फत पाणी शेतीला मिळू लागले. पारंपरिक करारानुसार नीरा डावा कालव्याचे पाणी बारामती व इंदापूर या तालुक्यांना मिळत आहे. परंतु, सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे या दोन्ही तालुक्यांना मिळणाºया पाण्यातून ३ टीएमसी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ........या चुकीच्या निर्णयाचा आणि राज्य शासनाचा आम्ही निषेध करतो. तसेच, आमच्या या हक्काच्या पाण्यासाठी कायदेशीर मार्गाने जाणार असून सर्व शेतकऱ्यांना घेऊन जन आंदोलन उभारणार असल्याचा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी दिला आहे.......साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले, खडकवासला कालव्याचे पाणी सणसर कटद्वारे येणारे पाणी बंद झाले आहे. यामुळे नीरा डावा कालव्याचे ५ नंबर पासद्वारे जे पाणी शेटफळ तलावात सोडले जाते, ते बंद करून खडकवासला कालव्याचे पाणी सुरू झाल्यास नीरा डावा कालव्याचा अतिरिक्त ताण कमी होईल. ........मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी सांगितल्याप्रमाणे जर नीरा डावा कालव्याची वहनक्षमता वाढवून तो एक्स्प्रेस केल्यास एका रोटेशनला जेवढा वेळ लागतो, तो कमी होऊन पाण्याची बचत होईल. उरलेले पाणी उन्हाळी आवर्तनाला वापरता येईल. ...............