यंदाच्या वर्षी फेसबुक दिंडी
राबविणार ‘आधार वारी’उपक्रम
कोरोनाकाळात पालक गमावलेल्या
बालकांना मिळणार आधार
बारामती : यावर्षी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३६ वे वर्ष आहे. यंदा कोरोना महामारीमुळे वारीचे स्वरूप वेगळे आहे. पण, आपल्या मनाच्या गाभाऱ्यातील पांडुरंगाला स्मरून यावर्षीची पंढरीची वारी साजरी करण्याचा संकल्प फेसबुक दिंंडीच्या वतीने करण्यात आला आहे. यावर्षी या दिंडीच्या वतीने 'आधार वारी'चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत कोरोनाकाळात ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत, त्यांना आपण आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आधार देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
यंदा फेसबुक दिंडी आणि आम्ही वारकरी (एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार्याने ‘आधार वारी’हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा फेसबुक दिंडीचे ११ वे वर्ष आहे. फेसबुक दिंडी नेहमीच पालखी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ अपडेट्स सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून नवनवीन उपक्रम घेऊन येते. फेसबुक दिंडी दर वर्षी आपल्या वारकऱ्यांसाठी वारीच्या प्रत्यक्ष अनुभूतीसोबत एक सामाजिक उपक्रम घेऊन येते.
आजपर्यंत प्रत्येक वर्षी राबविलेले फेसबुक दिंडीचे सामाजिक उपक्रम खालीलप्रमाणे आहेत. जलसंधारण मोहीम, वारी ‘ती’ची, नेत्रवारी, देह पंढरी - अवयव दान मोहीम, आठवणीतील वारी आणि यावर्षी 'आधार वारी' उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आधारवारीत सहभागी होण्यासाठी आपल्या आसपासच्या / माहितीतल्या ज्या पाल्यांचे पालक कोरोनामुळे मृत पावले असतील अशांची माहिती आम्हाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आम्ही वारकरी संस्थेचे रामभाऊ चोपदर, सचिन पवार, किरण कामठे आणि फेसबुक दिंडी टीमचे सदस्य स्वप्निल मोरे, संतोष पाटील,अमोल निंबाळकर, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, ओंकार महामुनी, अमोल गावडे कार्यरत आहे.
आधारवारी लोगो
३००६२०२१ बारामती—२०