शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी १ हजार ६९० शौचालयांची सुविधा; पालखीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:20 AM

पालिकेच्या घनकचरा विभागाने शहरात दिवसातून तीनवेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्याचे नियोजन केले आहे

पूणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) आणि श्री संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) यांच्या पालख्यांचे आगमन ३० जून रोजी पुणे शहरात होत आहे. त्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने शहरात दिवसातून तीनवेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्याचे नियोजन केले आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्यांचे झाडकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले आहे. शहरात वारकऱ्यांसाठी १ हजार ६९० पोर्टेबल व फिरती शौचालये पुरविण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी ही माहिती दिली.

पुणे पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्यांचे झाडकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले आहे. शहरात दिवसातून तीनवेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात येणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छताविषयक कामकाज करण्यासाठी अंदाजे एकूण ३५० पुरुष सफाई सेवक व २५० महिला सफाई सेविका असे एकूण ६०० सफाई सेवक आहेत. भवानी पेठ कार्यालयात अन्य क्षेत्रीय कार्यालयांकडून ६० अतिरिक्त सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ७ जेटिंग मशीनद्वारे साफसफाईचे कामकाज करण्यात आले. तसेच इतर क्षेत्रीय कार्यालयांतर्गतही सफाई सेवकांमार्फत व आवश्यकतेनुसार जेटिंग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालये, मुतारी व सर्व सिंगल पोर्टेबल टॉयलेटची स्वच्छता करण्यात येणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात महिला वारकऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार मनपा शाळेत व खासगी शाळेत मुक्कामाच्या ठिकाणी तसेच अन्य क्षेत्रीय कार्यालयांतर्गतदेखील महिला वारकऱ्यांसाठी शौचालय व न्हाणीघराची व्यवस्था करण्यात येणार आहे.

५० हजार सॅनेटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप

सार्वजनिक रस्त्यावर वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून आवश्यकतेनुसार सार्वजनिक स्वच्छताविषयक काम केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडून २ हजार ६२५ लिटर जर्मीक्लीन, ३७ हजार ५०० किलो कार्बोलिक पावडर, १९ हजार २५० किलो हर्बल वेस्टस्ट्रीट पावडर पुरविण्यात आली आहे. महिला वारकऱ्यांसाठी ५० हजार सॅनेटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022