पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिका करीत असलेल्या उपाय-योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने, अधिकाधिक मिळकत धारकांनी आपला मिळकत कर भरावा यासाठी पालिकेने २७ नागरिक सुविधा केंद्रांवर कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यास नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला असून, गेल्या दोन दिवसात पालिकेच्या तिजोरीत ६ कोटी ६४ लाख ९९ हजार ७२१ रुपए जमा झाले आहेत. कर संकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ व १२ मे रोजी जमा झालेल्या मिळकत करामध्ये ऑनलाईन वगळता २ कोटी २ लाख २ हजार २९५ रुपये या सुविधा केंद्राव्दारे जमा झाले आहेत. तर या दोन दिवसात ऑनलाईनव्दारे ४ कोटी ६२ लाख ९७ हजार ४२६ रुपए जमा झाले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून ४ हजार ४११ मिळकतधारकांनी तर २७ नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून १ हजार २२७ मिळकतधारकांनी आपला मिळकत कर भरला आहे. १ एप्रिल २०२० ते १२ मे, २०२० पर्यंत पालिकेच्या तिजोरीत मिळकत कराच्या माध्यमातून १२७ कोटी रुपए जमा झाले आहेत. दरम्यान अधिकाधिक मिळकत धारकांनी आपला थकित मिळकत कर भरावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३१ मेपर्यंत ५ ते १० टक्के सवलत थकबाकीमध्ये दिली जात आहे़. तर अनेक मिळकतधारकांना ई-मेल व एसएमएसव्दारेही मिळकत कराची रक्कम किती आहे याचा तपशील पालिकेकडून पाठविण्यात आला आहे.
पुणे महापालिकेकडून २७ नागरिक सुविधा केंद्रांवर मिळकत कर भरण्याची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 2:22 PM
दोन दिवसात ६ कोटी ६४ लाख रुपये जमा
ठळक मुद्देपुणे महापालिकेकडून असलेल्या उपाय-योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च