पुणे : निवडणुकीपूर्वी भाजपाकडून अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. मात्र केंद्रातील व राज्यातील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक अशी सगळीच मंडळी अडचणीत आली आहेत. पुणे शहराने भाजपाला खूप दिले मात्र पुणेकरांच्या समस्या सोडविण्यात ते हात आखडता घेत असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारच्या निषेधार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी लोकमान्य टिळक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक सुभाष जगताप, महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, आश्विनी कदम, नंदा लोणकर, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, सुहास उभे उपस्थित होते.बिबट्याला मारण्याचामंत्र्यांना परवाना दिलाय का?जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काय झालाय. ते जिथे-तिथे बंदूक का मिरवतात, असे विचारात त्यांना बिबट्या मारण्याचा परवाना मिळाला आहे का, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावीकोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे अजित पवार यांनी स्वागत केले. न्यायालयीन प्रक्रियेत जास्त वेळ न घालविता या तिघा आरोपींना लवकरात लवकर फाशीला लटकविण्यात यावे. तरच चुकीच्या नजरेने महिलांकडे पाहणाºयांवर जबर बसू शकेल, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.अद्याप विकास कुठेही दिसेनाअजित पवार म्हणाले, ‘‘भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई वाढली आहे. एकीकडे शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव नाही तर दुसरीकडे शहरातील नागरिकांना किफायशीर किमतीत वस्तू मिळत नाहीत. सरकार सध्या भानावर नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सत्ता आल्यावर राज्य सरकारने चार लाख कोटींचे कर्ज घेऊन अद्यापही विकास कुठेही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.’’सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणी सरकार गप्प का, सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला. सरकार यावर ठोस निर्णय का घेत नाही, हे सरकारचे अपयश असल्याचा उच्चार त्यांनी केला. मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागल्यावर आयटी विभाग प्रमुख विजय गौतम यांच्यासारख्या अधिकाºयाला हटवून काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रकरणी शिक्षणमंत्र्यांवर कारवाई का झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.राज्य सरकारने दिलेली आश्वासने गेल्या ३ वर्षांत पूर्ण केली नाहीत. त्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी यावेळी केली.मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जीएसटी रद्द झालाच पाहिजे, दुधाला भाव मिळायलाच हवा, अशा प्रकारचे फलक मोर्चातील कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलनाचा समारोप होणार आहे.
प्रश्न सोडविण्यात सत्ताधा-यांना अपयश - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 3:38 AM