शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया जाहीर वेळापत्रकानुसार सुरु करण्यास शिक्षण विभागाला अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 7:58 PM

शिक्षण हक्क कायद्या (आरटीई)अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया जाहीर वेळापत्रकानुसार सुरू करण्यास शिक्षण विभागाला यंदाही अपयश आले आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्या (आरटीई)अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया जाहीर वेळापत्रकानुसार सुरू करण्यास शिक्षण विभागाला यंदाही अपयश आले आहे. ही प्रक्रिया वेळेवर न सुरू करण्याची परंपरा विभागाने यंदाही कायम ठेवली आहे. त्यामुळे पुर्वी जाहीर केल्यानुसार सोमवार (दि. २५) पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नसून आता दि. ५ मार्च हा मुहुर्त काढण्यात आला आहे. 

आरटीई प्रवेश प्रक्रिया वेळेवर सुरू करण्यात शिक्षण विभागाला दरवर्षी अपयश येत आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गतच्या २५ टक्के राखीव जागा पूर्ण भरल्या जात नाहीत. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा करून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर झाले. त्याचबरोबर २४ जानेवारीपासून प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुवात केली होती़  त्यानंतर अनेकदा विविध टप्प्यांवर वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रक्रियेचा वाट न पाहता नियमित प्रक्रियेतून प्रवेश घेतले. यंदाही हीच स्थिती कायम आहे. जानेवारी महिन्यात प्रक्रिया सुरू करणार असल्याचे विभागाने  स्पष्ट केले होते. पण फेब्रुवारी महिन्यात शाळांच्या नोंदणीचे काम सुरू झाले. दि. ८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान ही नोंदणी होणार होती. त्यानुसार दि. २५ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार होते. तर दि. १४ वे १५ मार्च रोजी पहिली लॉटरी काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

पण शिक्षण विभागाला हे वेळापत्रक पाळण्यातही अपयश आले आहे. आता शाळांच्या नोंदणीसाठी दि. २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आता मार्च महिना उजाडावा लागणार आहे. आरटीईच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, आता दि. ५ ते २२ मार्च या कालावधीत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर लॉटरी काढून संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश मिळेल. त्यामुळे प्रवेशाची पहिली फेरी एप्रिल महिन्यात पुर्ण होईल. पण शिक्षण विभागाने नव्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार तरी प्रक्रिया सुरू होणार का, याबाबत पालकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.शहरातील बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांची पुर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीचे प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली आहे. या शाळांनी आरटीईसाठी नियमानुसार जागा रिक्त ठेवल्या आहेत. मात्र, आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी पात्र असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना इच्छित शाळेमध्ये प्रवेश मिळणे शक्य नाही. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रक्रियेची वाट न पाहता नियमित प्रक्रियेत प्रवेश घेतले आहेत. तर काही पालक अद्यापही प्रतिक्षेत असून प्रवेश मिळणार की नाही, याची भीती सतावत असल्याचे एका पालकाने सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणPuneपुणे