शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

प्रवाशांना बसतोय आर्थिक फटका, एसटी कर्मचा-यांचा संपाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 2:04 AM

थोड्या अंतरासाठी खासगी वाहनचालक जास्त भाडे आकारत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. हा बसचा संप त्वरित मिटावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

ओतूर : महाराष्ट्र राज्य एस. टी. कामगार संघटना, कृती समिती, इंटक, संघर्ष ग्रुप आदींनी विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे. या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. कारण ओतूर बसस्थानकात एकही बस आली नाही किंवा गेली नाही, अशी माहिती ओतूर बसस्थानक प्रमुख नामदेव गवारी यांनी दिली.नगर कल्याण व कल्याण नगर या महामार्गे दररोज जाऊन येऊन बसगाड्यांचे ३०० फेरे, दिवाळी निमित्त १०० जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. नारायणगाव आगाराच्या ओतूर येथून विविध गावांना जाणारया येणाºया बसच्या ३०० फेºया या शिवाय अकोले, पुणे शिवाजीनगर आगाराच्या बसेस ओतूरहूनच येतात. एकूण दररोज ५६८ फेºया होतात. संपामुळे एकही बस आली नाही. एस.टी.च्या संपाचा फटका महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स, बस स्थानकावरील हातगाडीवर विक्री करणारे फेरीवाले यांचे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान संप मिटून सेवा पूर्ववत व्हावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.भोर बसस्थानकात शुकशुकाट;भोर : पदनिहाय वेतनश्रेणीसह ७वा वेतन आयोग मंजूर करावा, कामगारांवर लादलेली जुलमी परिपत्रके रद्द करावी, कनिष्ठ कर्मचाºयांच्या त्रुटी दूर करण्यासाठी व विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारला आहे. एसटीच्या सर्व गाड्या बंद असल्यामुळे आज दिवसभर प्रवाशांचे मोठे हाल झाले.एसटी कर्मचा-यांच्या संपात भोर आगारातील १४० चालक, ११२ वाहक, ३१ कार्यशाळा कर्मचारी व इतर २४ असे एकूण ३०७ कर्मचारी संपावर गेल्यामुळे भोर-पुणे ७५ फेºया तर एकूण २४६ फेºया रद्द होणार असून, दररोजचा सुमारे २० हजार किलोमीटरचा प्रवास थांबणार असून दररोजचे ७ लाखाचे उत्पन्न बुडणार आहे. सदर संपामुळे ग्रामीण भागातील एसटी फेºया बंद होणार असल्याने शालेय विद्यार्थी व नागरिकांचे ऐन दिवाळीत हाल होणार असून संपाचा फटका लोकांना बसणार आहे. सदर संपात भोर आगारातील मोहन जेधे, गणेश मळेकर, दिलीप वरे, विजय राऊत, राजेंद्र भेलके, बाळासो धाप्ते, दीपक कांबळे, चंद्रकांत शिंदे, मनोज पाटणे, किसन देवघरे, बापू बांदल, सर्जेराव पडवळ, किरण गायकवाड व कर्मचारी सहभागी झाले आहेत.सासवड आगारात एसटी बंदला पाठिंबासासवड : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यात आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या काम बंदला सासवड आगारात १०० टक्के पाठिंबा मिळाला. दि. १६ सोमवारी रात्री १२ पासून सासवड आगारातील कामगार चालक वाहक कामावर न आल्याने सासवड आगाराच्या होणाºया एकूण २०६ फेºया रद्द झाल्या. एकही बसची फेरी न झाल्याने एसटीचे ऐन सणासुदीच्या काळातील उत्पन्न घटले आहे.

ऐन दिवाळीच्या वेळी हा संप सुरू झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नगर कल्याण मार्गे ओतूर येथून ३०० रुपये, आळेफाटा २० रुपये, नारायणगाव जुन्नर येथे जाण्यासाठी ओतूरहून २५ रू. ब्राम्हणवाडा २० रू दर खासगी वाहतूक करणारे घेत आहेत. प्रवाशांना नाइलाजास्तव आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड