शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

आमदार दिलीप मोहितेंच्या नावाने फेक अकाऊंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:09 AM

--- शेलपिंपळगाव : मागील काही दिवसांपासून फेसबुक हॅक होण्याच्या तसेच अन्य व्यक्तीच्या नावे बनावट अकाऊंट उघडून मदतीच्या नावाखाली पैसे ...

---

शेलपिंपळगाव : मागील काही दिवसांपासून फेसबुक हॅक होण्याच्या तसेच अन्य व्यक्तीच्या नावे बनावट अकाऊंट उघडून मदतीच्या नावाखाली पैसे मागण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या नावाने अज्ञात कोणीतरी फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून त्याद्वारे पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोशल मीडियावर घडलेला प्रकार आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी अधिकृत फेसबुक अकाउंटवरून सर्वांना ही बाब लक्षात आणून दिली आहे.

फेसबुक पेजवर Dilip Mohite Patil अशा इंग्रजीत नावाने कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अकाऊंट उघडले असून, सोबत या फेक अकाऊंटवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा फोटो वापरला आहे.

अकाउंटवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या आहेत. आमदार मोहिते पाटील यांचे नाव व फोटो पाहिल्याने अनेकांनी ही रिक्वेस्ट स्वीकारली आहे. मात्र शुक्रवारी (दि. २३) रात्री या फेक अकाउंटवरून मेसेजद्वारे काहींकडे ५० हजार रुपयांची गरज असल्याचे भासवून पैशांची मागणी करण्यात आली आहे.

सदरची बाब आमदार मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ ही बाब आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आमदार मोहिते यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. अशा खोटेपणाला कोणीही बळी पडू नका आणि समाजात अशा प्रकारे कारस्थान करणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केले आहे.