लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : कान्हूर मेसाई येथे नवव्या इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या मिडगुलवाडी येथील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून वापरत असल्याची घटना नुकतीच निदर्शनास आली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध बनावट फेसबुक अकाउंट बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील युवती कान्हूर मेसाई येथे इयत्ता नववीत शिकत असून या युवतीच्या नावे कोणीतरी फेसबुक अकाउंट बनवले. त्या मुलीच्या भावाला फेसबुकवर बहिणीच्या नावाचे फेसबुक अकाउंट दिसून आले. त्याने त्याचे बहिणीला तू फेसबुक कधी चालू केले, असे विचारले असता माझ्याकडे मोबाईलसुद्धा नाही आणि मी फेसबुक अकाउंटसुद्धा चालू केले नसल्याचे त्या युवतीने तिच्या भावाला सांगितले. यावेळी तुझ्या नावाने कोणीतरी फेसबुक अकाउंट बनविले आहे. तुझ्या नावाने तो इतरांशी चॅटिंग करत असल्याचे त्याने त्याच्या बहिणीला सांगितले . बनावट फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या भावाला तिचा मोबाईल नंबर व फोटोसुद्धा मागितला असल्याचे त्याने सांगितले. यानंतर कान्हूर मेसाई येथे नववीमध्ये शिकणाऱ्या युवतीने तिच्या वडिलांसह शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीने तिच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून वापरत असल्याबाबतची फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.
बनावट फेसबुक अकाउंट़; एकावर गुन्हा
By admin | Published: May 30, 2017 2:16 AM