शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

बनावटगिरी करणारा जाळ्यात

By admin | Published: June 05, 2016 3:48 AM

जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला असो अथवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म-मृत्यू नोंदणीचे प्रमाणपत्र पैसे मिळताच काही दिवसांत घरपोच आणून देणारा एजंट पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

चिंचवड : जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला असो अथवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म-मृत्यू नोंदणीचे प्रमाणपत्र पैसे मिळताच काही दिवसांत घरपोच आणून देणारा एजंट पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सायबू हनुमंता पल्ले यांच्या तक्रारीच्या आधारे चिंचवड पोलिसांनी सापळा रचून शनिवारी दिनकर लिंबाजी म्हस्के (वय ४९, रा. आनंदनगर, चिंचवड) या आरोपीला ताब्यात घेतले. गणेशनगर, थेरगाव येथे राहणारे सायबू हनुमंता पल्ले हे किराणा दुकानदार आहेत. त्यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दिनकर म्हस्के याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलगा शुभम याला शैक्षणिक सवलत मिळावी, यासाठी अनुसूचित जातीचे जातवैधता प्रमाणपत्र पाहिजे होते. आनंदनगर येथे राहणाऱ्या म्हस्के याने अवघ्या १५ दिवसांत जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून पल्ले यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. पल्ले यांच्या मुलाचे जातवैधता प्रमाणपत्र त्याने दिले. पुण्यातील इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शुभमने प्रवेश घेतला असल्याने, तेथे जातवैधता प्रमाणपत्र सादर केले होते. काही दिवसांनी संबंधित जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचे शैक्षणिक संस्थेने पल्ले यांना कळविले. म्हस्के याने ते शासकीय कार्यालयातून मिळवून न देता, स्वत:च तयार करून दिले असल्याचा संशय त्यांना आला. पल्ले यांनी तातडीने चिंचवडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. के. कुबडे यांच्याकडे धाव घेतली.पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.(वार्ताहर)तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आनंदनगर येथे आरोपी म्हस्के याला ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता, त्या ठिकाणी विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे आढळून आली. त्यामध्ये जातवैधता प्रमाणपत्र ५ (लातूर कार्यालय), शाळा सोडल्याचे दाखले १२ (काजळी, उस्मानाबाद येथील विद्यालयांच्या नावे), जन्म-मृत्यू प्रमाणपत्र ८ (उस्मानाबाद), उत्पन्नाचे दाखले ९२ (पिंपरी चिंचवड नायब तहसीलदार कार्यालय) अशा विविध प्रमाणपत्रांचा समावेश आहे.