पिंपरी : मावळमध्ये १४ लाख ८१ हजार ४३९ मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. मतदारसंघातील एकूण लोकसंख्येपैकी ५४.८७ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यात एकूण पुरूष मतदारांपैकी ७ लाख ७७ हजार ७४२ मतदारांनी हक्क बजावला तर ६ लाख ४० हजार ६५१ महिला मतदारांनी हक्क बजावला. प्रशासनाने मंगळवारी ही टक्केवारी जाहीर करत रात्री सात नंतर झालेल्या मतदानात दोन ते अडीच टक्क्याने मतदान वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
किरकोळ तांत्रिक अडचणी आणि शाब्दिक वाद वगळता मतदान शांततेत झाले. लोकसभेच्या या निवडणुकीत मतदारांमध्ये प्रचारातील निरुत्साह उतरल्याचे दिसून आले. गेल्या निवडणुकीत मावळमध्ये ५९.५७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावर्षी तेवढीही टक्केवारी गाठता आली नाही. एकूण ३३ उमेदवार रिंगणात होते; परंतु मुख्य लढत महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यातच झाली. येत्या ४ जूनला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.
४६ तृतीयपंथींनी बजावला हक्क
मतदारसंघात १७३ तृतीयपंथी मतदार होते. त्यापैकी फक्त ४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पनवेलमध्ये २०, कर्जत एक, उरण ४, मावळ १, चिंचवड ५ पिंपरी १५ तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले.
विधानसभा पुरूष महिला एकूण मतदार मतदान (टक्केवारी)
पनवेल : १६५४९८ १३०४५५ २९५९७३ ५०.०४कर्जत : १०२५१२ ८७३४० १८९८५३ ६१.३९उरण : ११३०७५ १०१०९० २१४१६९ ६७.०७मावळ : ११४२७१ ९२६७७ २०६९४९ ५५.४२चिंचवड : १८०१४५ १४२५५० ३२२७०० ५२.१९पिंपरी : १०२२४१ ८६५३९ १८८७९५ ५०.५५एकूण : ७७७७४२ ६४०६५१ १४१८४३९ ५४.८७