गेली महिनाभर कांदादर हे स्थिर राहिले आहेत. चांगल्या कांद्यास दहा किलोस दोनशे ते दोनशे पंधरा रुपये दर मिळाले. रविवारी मात्र दरात घसरण झाली. प्रति दहा किलो हे दर दोनशे रुपयांच्या खाली आले. पावसाळी वातावरणाने साठवलेला कांदा खराब होईल या भीतीने शेतकरी आता कांदा विक्रीस आणत आहेत. तर दरात मात्र घसरण होत आहे. मागणीत झालेली घट व परराज्यांतील कांदाविक्रीस येत असल्याने दरात घसरण झाली असल्याचे आडतदार व्यापारी संजय कुऱ्हाडे व जीवन शिंदे यांनी सांगितले. रविवार सात हजार सहाशे कांदा गोणी विक्रीस आला असल्याचे सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
प्रतवारीप्रमाणे प्रति दहा किलो दर असे- कांदा नंबर एक कांदा 170 ते 190 रुपये, दोन नंबर कांदा 130 ते 170 रुपये, तीन नंबर कांदा 60 ते 130 रुपये व चार नंबर कांदा 20 ते 60 रुपये.