लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर : येथील उपबाजारात रविवारी ५ हजार २९५ कांदा पिशव्यांची आवक झाली. नं १ गोळा कांद्यास प्रतवारीनुसार १० किलोस ३०० ते ३६० रुपये बाजारभाव कांदा उत्पादकांना मिळाला. गुरुवार पेक्षा नं १ गोळा कांदा भावात ५१ रुपयांची घसरण झाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे बाजारभाव खालील प्रमाणे: कांदा नं.१ (गोळा) -- ३०० ते ३६० रुपये. कांदा नं.२-२६० ते ३०० रुपये.
कांदा नं ३ (गोल्टा) २०० ते २६० रुपये.
कांदा नं४ (बदला)- ५० ते २०० रुपये.
बटाटा बाजारभाव : रविवारी बटाटा बाजारात फक्त १३९ बटाटा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस ४० ते १४० रुपये बाजारभाव मिळाला. बटाटा बाजारभाव स्थीर आहेत अशी माहिती ओतूर मार्केट चे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.