पुणे : कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १० दिवसांवर येऊन ठेपले असून श्रेयाववरून पुणे बार असोसिएशन आणि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन यांच्यातील मानापमान नाट्य रंगले आहे. अखेर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांच्या बैठकीनंतर उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही संघटनांना समसमान संधी देण्याचे निश्चित झाल्यानंतर या नाट्यावर पडदा पडला.शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ कौटुंबिक न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन १२ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.उद्घाटनाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर उपस्थित नसल्यामुळे त्यांचे नाव प्रसिद्ध करण्यात आले नाही. यावरूनच मतभेद सुरू झाले. उद्घाटनासाठी कोणत्या संघटनेने पुढाकार घ्यायचा यावरून चर्चा सुरू झाली. कार्यक्रमात व्यासपीठावर दौंडकर यांना संधी देण्यात यावी. तसेच कार्यक्रमपत्रिकेत त्यांचे नाव असायला हवे. नवीन इमारतीत ज्युनिअर वकिलांसाठी लॉकर्सच्या सुविधा उपलब्ध असाव्यात, अशा मागण्यात पुणे बार असोसिएशनकडून करण्यात आल्या आहेत, अशा अफवा पसरविल्या गेल्या. फॅमिली कोर्ट असोसिएशनतर्फे खुलासा करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार उद्घाटनचाकार्यक्रम दोन्ही संघटना एकत्रित करणार आहेत. यासंदर्भातदौंडकर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, मतभेद मिटविण्यात आले असून पक्षकारांसाठी असलेली नवीन इमारतीची सुविधा आपल्यासाठी महत्त्वाची आहे.
कौटुंबिक न्यायालय उद्घाटन: मानापमान नाट्यावर पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:54 AM