या वेळी डॉ. ढुमणे, उद्योजक विशाल टेमकर आणि डॉ. बिडगर सुदाम उपस्थित होते.
या वेळी वायाळ म्हणाले, की किराणा किटसाठी अमिटी विद्यापीठाचे डीन अमोल शिंपी, पूजा पवार यांनीसुद्धा हातभार लावला आहे. सध्याच्या काळात माणसांनी माणुसकी जपत लोकांना मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांनी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावा.
या वेळी डॉ. ढुमणे यांनी वस्तीवरील जनतेला मास्क आणि सॅनिटायझरचे महत्त्व समजावले. मास्कचा वापर कसा करायचा हे टेमकर यांनी सांगितले.
प्रत्येक गावात गरीब गरजू लोक आहेत, ज्यांचे हातावरील पोट असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशांना स्थानिक दानशूरांनी वस्तू स्वरूपात मदत केल्यास असे प्रश्न गावपातळीवरच सुटतील. विशाल टेमकर यांनी प्लाझ्मा डोनरसाठी महत्त्वाचे काम करत आहे. त्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन वायाळ यांनी केले.
---
फोटो क्रमांक : ०३अवसरी खुर्द किराणा वाटप
खालील ओळी : अवसरी खुर्द येथील फासेफारधी वस्तीवर आय आर बी चे सरव्यवस्थापक रवींद्र वायाळ यांच्या हस्ते किराणा किट आणि मास्कचे वाटप करण्यात आले.