बारामती: राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेमार्फत बारामती तालुक्यात जानेवारी २०२१ पासून ऑगस्टअखेर एकूण ३० प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. त्यापैकी २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली, तर ५ प्रकरणे नामंजूर करण्यात आल्याची माहिती बारामती संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष धनवान वदक व तहसीलदार विजय पाटील यांनी माहिती दिली.
मंजूर प्रकरणात मयताच्या प्रत्येक वारसास २० हजारांचे अनुदानाच्या धनादेशाचे वाटप केले आहे .राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेमार्फत सन २००२-०७ चे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयाची कुटुंबप्रमुख कमावती व्यक्ती मयत झाल्यापासून ३ वर्षांचे आत वारसदारांनी राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना अर्ज कागदपत्रासह तलाठी यांचेकडे दाखल करावेत. सदर प्रकरणे तहसील कार्यालयात आल्यानंतर त्यावर निर्णय होऊन मंजूर, नामंजूर केली जातात. तरी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कोरोना काळात मयत झालेल्या कुटुंबातील वारसांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा, असे तहसीलदार विजय पाटील यांनी केले. ही योजना तहसील विभागामार्फत राबविली जात असल्याची माहिती नायब तहसिलदार महादेव भोसले व अव्वल कारकून सुरेश जराड यांनी दिली.
संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांनी लाभार्थ्यांना धनादेश वाटप केले.
०९०९२०२१ बारामती—०५