शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अपघाताचा फोन खणाणला आणि दहा वर्षांनी कुटुंबियांना ‘दीपक’ मिळाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 4:57 PM

पुण्यामध्ये आल्यानंतर दीपकने एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. त्यानंतर जेमतेम एक महिना त्याने कुंटुंबियासोबत दूरध्वनीवरुन संपर्क ठेवला. त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क करणे त्याने बंद केले.

ठळक मुद्देरिअल लाईफ रिअल पिपलचा पुढाकार उत्तराखंडचा तरुण दहा वर्ष घरापासून होता वंचित 

- प्रकाश गायकर- पिंपरी : एक दिवस उत्तराखंडमधील पियोरागड जिल्ह्यातील किलगाव येथील जखमी झालेल्या दीपक चंदच्या घरी शेजारील गावच्या प्रमुखाचा फोन आला. फोनवर सांगण्यात आले की, तुमचा भाऊ दीपक याचा पुण्यामध्ये अपघात झाला आहे. दहा वर्षांपूर्वी अचानक गायब झालेल्या भावाचा अपघात झाल्याचे ऐकून भाऊ संदीप यांना काय बोलावे ते सुचेना. फोनवरच त्यांना रुग्णालयाचा पत्ता देण्यात आला. आपल्या दोन नातेवाईकांना घेऊन संदीप यांनी उत्तराखंडमधून पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय गाठले. भावाला जखमी अवस्थेमध्ये पाहून संदीप यांच्या भावनेचा बांध फुटला. भावाचा अपघात झाल्याने मनात दु :ख तर झालेच होते, मात्र अपघात झाला म्हणून भाऊ भेटला याचे समाधानही वाटत होते. दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये दीपक रोजगाराच्या शोधात पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये आल्यानंतर त्याने एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. त्यानंतर जेमतेम एक महिना त्याने कुंटुंबियासोबत दूरध्वनीवरुन संपर्क ठेवला. त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क करणे त्याने बंद केले. त्यानंतर भाऊ संदीप चंद यांने आपल्या जवळच्या नातेवाईकांना घेऊन पुण्यामध्ये भावाची शोधाशोध केली. शहरातील नामवंत कंपन्या, हॉटेल्स, सोसायट्या आणि परिसर पिंजून काढला. मात्र दीपकचा कुठेच शोध लागला नाही. काही दिवस शोधाशोध केल्यानंतर कुटुंबियांनी तो पुन्हा येण्याच्या सर्व आशा सोडून दिल्या. 

पुनावळे येथे दीपकचा अपघात झाल्यानंतर त्याला वायसीएममध्ये दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर समजले की या तरुणाचे कोणीही नाही. रिअल लाईफ रिअल पिपलचे संस्थापक एम.ए.हुसैन यांनी त्या तरुणाची जबाबदारी स्वीकारली. जखमी अवस्थेत तरुणाकडे विचारपूस केल्यानंतर त्याने उत्तराखंड येथील त्याचा पत्ता सांगितला. फोन नंबर नसल्याने एम.ए.हुसैन यांनी जवळील गावच्या प्रमुखाला फोन करुन सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर कुटुंबियांपर्यंत दीपकच्या अपघाताची बातमी पोहचली. या कार्यामध्ये समाजसेवक महादेव बोत्रे, रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेचे कर्मचारी, रुग्णालयातील परिचारिका यांची साथ लाभली. अपघात झाल्यामुळे दहा वषार्पासून काहीही संपर्क नसलेल्या भावाचा शोध लागला. तर दहा वषार्पूर्वी अचानक सोडून गेलेला मुलगा पुन्हा मिळाला म्हणून आईच्या आशा पल्लवित झाल्या. 

दीपकने घरच्यांसोबत संपर्क तोडला होता. खूप शोधूनही तो मिळाला नाही तेव्हा आम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या. तो मृत झाला आहे असे समजून आम्ही त्याचा मृत्यूचा दाखला काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र त्याचा अपघात झाल्यानंतर रिअल लाईफ रिअल पिपल ही संस्था मदतीसाठी धावून आली. या संस्थेमुळे दहा वर्षांनी माझा भाऊ सापडला.- संदीप चंद, भाऊ.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात