वैभव गायकर
पनवेल : भौगोलिकदृष्ट्या अत्यंत क्लिष्ट असलेल्या लोकसभेच्या मावळ मतदार संघातील लढत प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवित आहेत. तर शिवसेनेने पुन्हा श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली आहे.
शरद पवार यांच्या दृष्टीने मावळची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी या मतदार संघात तळ ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: शरद पवार यांनी कळंबोलीत जाहीर सभा घेतली होती, तर अजित पवार यांनी येथील प्रचाराची सर्व सूत्रे स्वत:च्या हातात घेतली आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पनवेल व उरणमध्ये मतदारांशी संवाद साधला, तर पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पार्थ यांच्या प्रचारावर आपले लक्ष केंद्रित केले. पार्थ यांचे चुलत भाऊ रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे.पार्थ पवार । राष्ट्रवादी काँग्रेसपार्थ अजित पवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहेत. राजकीय घराण्यातील असले तरी सार्वजनिक क्षेत्रात ते पहिल्यांदाच नशीब आजमावत आहेत.वडील । अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्रातील एक वजनदार नेते. पार्थ पवार यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे स्वत:कडे ठेवली आहेत.आई । सुनेत्रा पवारआतापर्यंत गृहिणी म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच आपल्या मुलाच्या प्रचारासाठी उतरल्या आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदारांना आवाहन करीत आहेत.आजोबा । शरद पवारपार्थ यांच्या माध्यमातून पवार कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यांनी मतदार संघात प्रचाराचा धडाका लावला आहे.आत्या । खा. सुप्रिया सुळेसुप्रिया सुळे या स्वत: बारामतीतून निवडणूक लढवित आहेत. पार्थ यांच्यासह स्वत:च्या मतदार संघात प्रचार करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. आतापर्यंत मावळ मतदार संघात प्रत्यक्ष प्रचारात सहभाग नोंदविता आला नसला तरी फोन व इतर माध्यमाद्वारे त्यांनी पार्थसाठी प्रचार सुरू ठेवला आहे.्रचुलत भाऊ । रोहित पवाररोहित पवार यांनी मावळ मतदार संघातील पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचारावर भर दिला आहे.