शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

पंधरा वर्षात प्लास्टिक वगळता कचऱ्याचा कण घराबाहेर न टाकणारे कुटूंब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 6:00 AM

विशेष म्हणजे घरात त्यांनी आजपर्यंत टिव्हीही घेतलेला नाही...

ठळक मुद्दे‘झीरो वेस्ट फॅमिली’ ने टेरेसवर फुलविला कंपोस्ट खतातून मळा  वाळलेल्या झाडांच्या फांद्या तसेच नारळाच्या झावळ्यांचा वापर घरातील ‘बॉयलर’साठी झाडांच्या फांद्या, नारळाच्या करवंट्या, वाळलेला पालापाचोळा आदीचे अंगणातच कंपोस्ट खत

निलेश राऊत - पुणे : घर-अंगण स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडणारी कुटुंबे आपण नित्याने पाहतो. मात्र घरातील व घराच्या अंगणातील कचरा घराबाहेरच जाऊ न देता तो घरातच जिरवायचा आणि वापरायचा, हे  ब्रीद घेतलेली माणसे दुर्मिळात दुर्मीळ आहेत. असेच एक कुटुंब पिंपळे निलखमध्ये वास्तव्यास आहे. या कुटुंबाने गेल्या पंधरा वर्षात प्लॅस्टिक वगळता कचऱ्याचा एकही कण घराबाहेर जाऊ दिलेला नाही नाही. डॉ़साधना व डॉ़ पांडुरंग पाटील ही ती ‘झीरो वेस्ट फॅमिली.’ त्यांचे घर म्हणजे एक जंगलच असून अंगणाच्या कुंपणाला नारळाच्या झाडांच्या झावळ्या, झाडांच्या तुटलेल्या फांद्यांचे आच्छादन आहे. घराच्या दरवाज्यातच गप्पी माशांसाठी बांधलेली खुली टाकी, गच्चीत विविध झाडे हे त्यांचे वैभव आहे. 

होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या साधना यांनी गेल्या वीस वर्षात पती पांडुरंग यांच्या सहकार्याने बंगल्याच्या गच्चीत मोठा मळा फुलविला आहे. गच्चीवर शेततळ्याकरीता वापरण्यात येणारे काळे ‘शिट’ आंथरून त्यावर मातीचा थर तोही घरातील कचऱ्यापासून तयार झालेल्या कंपोस्ट खतासह पसरला आहे. याठिकाणी आंबा, आवळा, लिंबू, सोनचाफा़, रातराणी या झाडांची घरापुरते उत्पादन देणारी बाग तयार केली आहे. याकरिता कुठलेही रासयनिक खत त्या वापरत नाहीत.
स्वयंपाक घरातील ओला व सुका कचरा (प्लॅस्टिक वगळून), बंगल्याच्या दीड गुंठे परिसरातील झाडांच्या फांद्या, नारळाच्या करवंट्या, वाळलेला पालापाचोळा आदीचे अंगणातच कंपोस्ट खत तयार करतात. घराच्या कुुंपणावर टाकलेल्या व कालांतराने वाळलेल्या झाडांच्या फांद्या तसेच नारळाच्या झावळ्यांचा वापर घरातील ‘बॉयलर’साठी केला जातो.     सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मूळ निवासी असलेले हे पाटील दांम्पत्य आपल्या ‘ झीरो वेस्ट फॅमिली ’ म्हणून जीवन जगत आहे. विशेष म्हणजे घरात त्यांनी आजपर्यंत टिव्हीही घेतलेला नाही. नित्य कामकाज झाल्यावर दोघेही आपला पूर्ण वेळ घर-अंगणातील निसर्ग पुजेला देतात. ----------------------------

टॅग्स :PuneपुणेHomeघरFamilyपरिवारGarbage Disposal Issueकचरा प्रश्नenvironmentपर्यावरण