शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

तिच्या मृत्युनंतर कुटुंबाला तीन वर्षांनी मिळणार 62 लाख रूपये; समुपदेशनाद्वारे दावा निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 8:42 PM

पतीने कारमालक आणि संबंधित विमा कंपनीच्याविरोधात दावा दाखल करत 80 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली...

पुणे - ’ती’चा 2015 मध्ये अपघात झाला. तब्बल तीन वर्षे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र 2018 मध्ये  ‘ती’ हे जग कायमचे सोडून गेली. अपघातात मृत्यू झालेल्या या विवाहितेचा दावा केवळ समुपदेशनामुळे तीन वर्षांनी निकाली निघाला आहे. यामुळे तिच्या पतीला 62 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.

स्नेहल गणेश धुमाळ असे मयत विवाहितेचे नाव आहे. ती एस.वाय.बी.कॉमला शिकत असताना शेजारी राहणाऱ्यांबरोबर अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघाली होती. त्यावेळी एका वळणावर कार पलटी झाली. 4 एप्रिल 2015 झालेल्या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली. सोलापूर येथील येथील एका रुग्णालयात उपचार देण्यात आले. त्यानंतर पुण्यातील जहांगीर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीन वर्षे उपचार सुरू होता. त्यानंतर 23 मार्च 2018 मध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या उपचारासाठी 50 लाख रुपये खर्च आला.

पतीने कारमालक आणि संबंधित विमा कंपनीच्या विरोधात दावा दाखल करत 80 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली. जिल्हा न्यायाधीश एस.एन.सोनवणे यांनी समुपदेशानासाठी अँड. अतुल गुंजाळ यांच्याकडे हे प्रकरण पाठविले. अँड. गुंजाळ यांनी दोनदा समुपदेशन केल्यानंतर हे प्रकरण निकाली निघाले. अर्जदाराकडून ड. एस.जी. जोगवडीकर यांनी तर, विमा कंपनीच्या वतीने अँड. सुनील द्रविड यांनी काम पाहिले.-------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयWomenमहिला