पुणे : ‘शहीद सौरभ फराटे यांचे बलिदान देश विसरणार नाही. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात फराटे यांच्या मुलांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेण्याचे ठरविले आहे,’ अशा शब्दांत मुस्लिम को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.फुरसुंगी येथील सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुस्लिम सहकारी बँकेच्या वतीने बुधवारी सकाळी २ लाख रुपयांची रक्कम डीमांड ड्राफ्टद्वारे मदत म्हणून देण्यात आली. या वेळी बँकेच्या उपाध्यक्ष मुमताज सय्यद, संचालक इम्तियाझ शिकिलगर, लुकमान खान, मुनावर शेख, अझीम गुडाखूवाला, तबस्सूम इनामदार तसेच सामाजिक कार्यकर्ते श्यामराव कुतवळ उपस्थित होते.
फराटेंच्या मुलांची जबाबदारी घेणार
By admin | Published: December 22, 2016 2:21 AM