पुणे : रिक्षाच्या वेटिंग कालावधीचा १०० सेकंदांचा टप्पा कमी करून ६० सेकंदांचा करावा, अशी मागणी करून अप्रत्यक्षरीत्या भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा संघटनांच्या वतीने परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये करण्यात आली. ग्राहक संघटनांकडून त्याला विरोध दर्शविण्यात आला आहे.निवासी उपजिल्हाधिकारी सूरज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची आज बैठक झाली. या वेळी प्राधिकरणाचे सचिव प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार, सजग ग्राहक मंचाचे विवेक वेलणकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक यांच्यासह रिक्षा व ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीएनजीचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १५ वर्षांपुढील रिक्षा आरटीओकडून बाद करण्यात येत आहेत. वस्तुत: काही दिवसांपूर्वीच रिक्षाला एलपीजी/सीएनजी बसवून रिक्षा चालकांनी खर्च केलेला आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
‘वेटिंग’च्या माध्यमातून भाडेवाढीची मागणी
By admin | Published: August 27, 2014 5:04 AM