जयश्री कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अतिशय चांगले सहकार्य केले. त्यामुळे दौंड तालुक्यातील तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना पोहोचवता आल्याचे सांगितले. तसेच यामुळेच पुणे जिल्ह्यात मनरेगा, फळबाग लागवड, महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन योजना, विविध विस्तार योजना, शेतकरी शेतीशाळा, विविध पिकांचे प्रकल्प इ. योजनांचे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून अंमलबजावणी करून सर्व योजनांमध्ये दौंड तालुका प्रथम क्रमांकावर ठेवण्यात यशस्वी झाल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास सर्व मंडळ कृषी अधिकारी, आप्पासाहेब खाडे, स्वप्निल बनकर, दिनेश फडतरे, महेंद्र जगताप इ. उपस्थित होते. तर कृषी विभागाच्या वतीने पोपट चिपाडे, शीतल मगर, युसुफ तडवी, संध्या आखाडे, अंगद शिंदे इ. नी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दौंड तालुका कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोणकर यांनी केले तर आभार अंगद शिंदे यांनी मानले.
280821\img-20210827-wa0004.jpg
दौंड तालुका कृषि अधिकारी जयश्री कदम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.