शहरातील आझाद सोशल अँड स्पोर्टस् क्लब लाटेआळी, सरदार पेठ गणेश मंडळ, छत्रपती संभाजी गणेश मित्रमंडळ, संभाजीनगर आदी मंडळांच्या गणेशमूर्तीचे दुपारी विसर्जन करण्यात आले. शहरातील बहुतांशी सार्वजनिक गणेश मंडळांनी सायंकाळी गणेशाचे विसर्जन केले. शहरातील हलवाई चौकातील हलवाई चौकाच्या राजाचे सायंकाळी साडेसहा वाजता व पूर्वमुखी हनुमान गणेश मंडळ सोनार आळीच्या गणेशाचेही साडेसहा वाजता, छत्रपती शिवाजी गणेश मित्रमंडळ लाटेआळी यांच्या गणेशाचे सात वाजता, तर आझाद हिंद गणेश मित्रमंडळ सुभाष चौकाच्या गणेशाचे साडेसात वाजता विसर्जन करण्यात आले. अखिल रामआळी गणेश मित्रमंडळ, मुंजोबा गणेश मित्रमंडळ भाजीबाजार, या गणेश मंडळाचेही सायंकाळी गणेशाचे विसर्जन करण्यात आले.
शनिमंदिर येथील विसर्जन घाटावर शिरूर नगर परिषद, शिरूर एन्व्हायर्नमेंट फोरम व वात्सल्यसिंधू फाउंडेशन या संस्थांच्या मदतीने गणेशमूर्ती दान उपक्रमांतर्गत गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन न करता ही गणेशमूर्ती दान करावी, असे आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला व ३०० हून अधिक गणेशमूर्तींचे यावेळी संकलन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाचा दिवशी शहरातील विसर्जन घाटावरील गर्दी टाळण्यासाठी शिरूर नगर परिषदेने शहरातील निर्माण प्लाझासमोरील मोकळी जागा गुजर मळा, रयत शाळेचे मैदान, शनी मंदिर विसर्जन हौद, कुंभार आळी येथील घाट, अशा चार ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर शनी मंदिर येथील विसर्जन घाटावर शिरूर एन्व्हायर्नमेंट फोरम व वात्सल्यसिंधू फाउंडेशन या संस्थांच्या मदतीने ज्या नागरिकांना मूर्ती दान करायची आहे त्यांच्यासाठी तेथे व्यवस्था करण्यात आली होती.
याठिकाणी ३०० हून अधिक मूर्तींचे संकलन करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, शिरूर एन्व्हायर्नमेंटल फोरमचे मध्यकांत पानसरे, प्रा. सतीश धुमाळ, वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या उषा वाखारे, जयश्री लंघे, स्वाती थोरात, वाघ अकॅडमीचे चैतन्य वाघ, रसिक कांकरवाल हिलिंग लाइव्हसचे संतोष सांबारे, स्वप्नील फलके यांच्यासह वरील संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमांर्गत गणेशमूर्ती दान करणाऱ्या भाविकांना प्रसिद्ध उद्योगपती व सभागृहनेते प्रकाश धारीवाल यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गुजर कॉलनी येथे सुमारे २०० हून आधिक गणेशमूर्तींचे विसर्जन पालिकेने तयार केलेल्या हौदात करण्यात आले. नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार यांच्यासह पालिकेचे अधिकारी याठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर गणेशमूर्ती संकलन रथाची व्यवस्था करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे ‘आम्ही शिरूरकर फाउंडेशनच्या वतीने गणपती बंदोबस्तावरील सर्व पोलीस बांधवांना त्यांच्या बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन पोळी भाजी, पाण्याच्या बाटलीचे वाटप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले.
210921\img-20210920-wa0048.jpg
शिरुर नगरपरिषदेच्या वतीने उभारलेल्या मुर्ती दान कक्षात गणेश भक्तांनी गणेशमुर्ती दान केल्या